काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे राहुल गांधी यांनी मतदान प्रक्रियेवर गंभीर आरोप केले होते. नागरिकांनी केलेलं मतदान मतमोजणी प्रक्रियेदरम्यान चोरीला जात असल्याच्या राहुल गांधीच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप देखील पाहायला मिळाले आहेत. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
मुंब्र्यातील गणेशघाट खाडीपरिसरात मोठ्या संख्येने मतदान कार्ड फेकलेले आढळून आले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने साफसफाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना एका पिशवीत जास्तीच्या संख्येने मतदान कार्ड फेकल्याचं आढळून आलं. या प्रकरणा ने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान कार्ड का फेकली आणि हे नेमकं कोणी केलं याबाबत अद्यापतरी ठोस माहिती नाही.
प्राथमिक माहितीनुसार असं सांगितलं जात आहे की, ही सर्व मतदान कार्ड कळवा परिसरातील आहेत. त्याचबरोबर मतदान यादी क्र. 72 मधील तपशीलानुसार, मतदान कार्डावरील नावं आणि पत्ता यांचा ताळमेळ नसल्याचा आरोप देखील काही सामाजिक संघटनेकडून करण्यात येत आहे.काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष नीलेश पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गणेशघाट परिसरात धाव घेत या कार्डाचा फोटो आणि व्हिडिओ तयार केला. या सर्व कार्डाची तपासणी केली असता ही कार्डे कळवा परिसरातील असल्याचे समोर आले आहे. या 72 क्रमांकाच्या यादीत फेरफार करण्यात आला असून जवळपास 250 मतदान कार्ड हे बोगस असल्याचं सांगितलं जात आहे. हा सगळा प्रकार धक्कायक असून पाोलीसात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने या संवेदनशील प्रकरणाची दखल घेऊन नि:पक्षपाती चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे.
कळवा परिसरातील मतदान यादी क्रमांक 72 मध्ये फेरफार करुन हे पॅन कार्ड आणि मतदान कार्ड फेकले आहेत. याबाबत क्राँग्रेसचे वासीम सैय्यद यांनी चौकशीची मागणी लावून धरली आहे. .या आधीच्या निवडणूकीत ठरावीक पक्षाला जास्तीत जास्त मतं मिळावी असा प्रयत्न केला गेला त्यांनीच हे सगळं केलं असावं हा संशय सय्यद यांनी व्यक्त केली आहे. या सगळ्या प्रकरणावर योग्य ती दखल घेत तपास जारी करावा अशी मागणी सामाजिक संघटना करत आहेत.