राहुल गांधी-तेजस्वी यादवांच्या मत अधिकार यात्रेमुळे वाढली भाजपची धाकधुक
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव बिहारमध्ये विशेष सघन सुधारणा (SIR) विरोधात मोठी यात्रा काढत आहेत. याला ‘मतदार हक्क यात्रा’ असे नाव देण्यात आले आहे. या यात्रेत गर्दी जमत असल्याचे पाहून भाजपची धाकधुक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राहुल गांधींची यात्रा पाहता भाजपने आपल्या आपल्या मोठ मोठ्या नेत्यांसह NDAतील मित्रपक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे.
बिहारमधील विशेष सघन सुधारणा प्रक्रिया आणि मतचोरीच्या मुद्द्यांविरोधात राहुल गांधी यांनी ही यात्रा सुरू केली असून इंडिया आघाडीचे अनेक नेते या यात्रेत सहभागी होताना दिसत आहेत. दुसरीकडे बिहारमध्ये सुरू असलेल्या SIR प्रक्रियेमुळे भाजप किंवा NDAला कोणताही फायदा मिळाला नाही, उलट NDA ला पाठिंबा देणारे अनेत मतदारांची नावेही मतदार यादीतून वगळ्यात आली आहेत. SIR आणि वक्फ सुधारणा विधेयकामुळे RJD आणि काँग्रेसच्या बाजूने मुस्लिम-यादव समीकरण मजबूत झाल्याचा दावा भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने केला आहे.
बिहारमधील जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांनी त्यांच्या मोठ्या नेत्यांवर केलेले आरोप देखील भाजपसाठी अडचणीचे ठरत आहेत. प्रशांत किशोर यांनी बिहार भाजप अध्यक्ष दिलीप कुमार जयस्वाल, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि आरोग्यमंत्री मंगल पांडे यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रशांत किशोर यांनी तिघांवरही भ्रष्टाचार आणि अनियमिततेचे आरोप केले आहेत तर भाजपने त्यांचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. किशोर यांनी दिलीप जयस्वाल यांनी फसवणूक करून एका शीख संस्थेचा ताबा घेतल्याचा, सम्राट चौधरी यांनी त्यांच्या शैक्षणिक नोंदींमध्ये छेडछाड केल्याचा आणि मंगल पांडे यांनी रुग्णवाहिका घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला आहे.
बिहार भाजप सूत्रांचे म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या प्रतिमेद्वारे आणि एनडीएच्या एकत्रित मोहिमेद्वारे त्यांचे कोणतेही नुकसान भरून काढले जाऊ शकते, असा पक्ष नेतृत्वाला विश्वास आहे. तर पक्षाने राज्यातील सर्व ३८ जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषदा घेण्याचे काम देखील त्यांच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना सोपवले आहे. एनडीएने बिहारच्या सर्व २४३ विधानसभा जागांवर जनसंपर्क करण्यासाठी १४ पथके तयार केली आहेत. विशेष म्हणजे, राहुल गांधींच्या दौऱ्यादरम्यान एवढी मोठी गर्दी जमेल अशी अपेक्षा नव्हती, अशी कबूलीही दिली आहे.
Rahul Gandhi News: गुजरातमधील अज्ञात पक्षांना ४३०० कोटींच्या देणग्या? राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर
भाजपच्या एका खासदाराने सांगितले की, आम्ही मागे पडलो म्हणून राहुल गांधींच्या यात्रेत गर्दी जमली. प्रशांत किशोर यांच्या आरोपांमुळे आमच्या नेत्यांवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. यादव आणि मुस्लिम समुदायाचे मतदार राजद आणि काँग्रेसशी एकत्र येत असल्याचे दिसून येत आहे. दलित समुदायाचा काही भाग भारत आघाडीकडेही जात आहे. ज्या पद्धतीने राहुल गांधींच्या यात्रेला किंवा एसआयआरला मुद्दा बनवले जात आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत एनडीएचे काही नुकसान होऊ शकते, असही या खासदाराने म्हटले आहे.