गुजरातमधील अज्ञात पक्षांना ४३०० कोटींच्या देणग्या? राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
Rahul Gandhi News: लोकसभा खासदार राहुल गांधी यांनी ७ ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांमुळे देशभरात एकच खळबळ माजली आहे. अशातच बिहारमध्ये सुरू असलेल्या मत अधिकार यात्रेत बोलताना राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. गुजरातमधील अज्ञात पक्षांना ४हजार ३०० कोटींच्या देणग्या कुठून मिळाल्या, असा सवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला केला आहे. राहुल गांधींच्या या आरोपांवरून देशात आणखी एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची मत अधिकार यात्रा काल बिहारमधील मधुबनी येथे पोहचली, या वेळी जनतेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी दैनिक भास्कर च्या अहवाल सादर करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. याशिवाय त्यांनी त्यांच्या ट्विटर एक्सवरही पोस्ट शेअर केली आहे. “गुजरातमधील 10 अज्ञात पक्ष आहेत. पण या पक्षांना ४ हजार ३०० कोटींच्या देणग्या कुठून मिळाल्या, या पक्षांनी फार कमी वेळा निवडणुका लढवल्या आहेत किंवा त्यावर खर्च केला आहे. हे हजारो कोटी कुठून आले? हे पक्ष कोण चालवत आहे? आणि या पक्षांना मिळालेले पैसे कुठे गेले? निवडणूक आयोग चौकशी करेल की ते येथेही प्रथम प्रतिज्ञापत्र मागणार की हा डेटा लवपण्यासाठी कायदाच बदलणार? असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.
भारताचा अमेरिकेला थंड प्रतिसाद; PM मोदी ट्रम्पचा फोन का टाळतायत? जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून
राहुल गांधी सध्या बिहारमध्ये १६ दिवसांच्या ‘मतदार हक्क यात्रे’वर आहेत. ही यात्रा १,३०० किमी पेक्षा जास्त अंतराची ही यात्रा असणार आहे. २० जिल्ह्यांमधून ही मत अधिकार यात्रा प्रवास करणार असून१ सप्टेंबर रोजी पाटणा येथे यात्रेची सांगता होणार आहे. पण या यात्रेदरम्यान, राहुल गांधी आणि तेजस्वी यादव निवडणूक आयोगावर सातत्याने मतदार यादीतील अनियमितता आणि मतचोरीचा आरोप करताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर एक्सवर दैनिक भास्करमधील अहवालही प्रसिद्ध केला आहे.
गुजरातमध्ये नोंदणीकृत १० अज्ञात राजकीय पक्षांना २०१९-२० ते २०२३-२४ या पाच वर्षात ४३०० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. विशेष म्हणजे, या काळात गुजरातमध्ये झालेल्या तीन निवडणुकांमध्ये (२०१९, २०२४ मध्ये दोन लोकसभा आणि २०२२ मध्ये विधानसभा) या पक्षांनी फक्त ४३ उमेदवार उभे केले आणि त्यांना एकूण ५४,०६९ मते मिळाली. या पक्षांनी आणि त्यांच्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अहवालांवरून हे उघड झाले आहे. निवडणूक अहवालात त्यांनी फक्त ३९.०२ लाख रुपये खर्च दाखवला आहे, तर ऑडिट अहवालात ३५०० कोटी रुपये खर्च दाखवला आहे.
धक्कादायक! मुलांच्या हातात बाईकची चावी देणं पडलं महागात; घडला भयंकर अपघात, Video Viral
२०२२-२३ मध्ये मिळालेल्या ४०७ कोटी रुपयांच्या देणगीबद्दल, न्यू इंडिया युनायटेड पक्षाचे राष्ट्रीय प्रमुख अमित चतुर्वेदी यांनी दैनिक भास्करला सांगितले – मला सीएला विचारावे लागेल. निवडणूक खर्चाचे विवरणपत्र अपलोड केले गेले आहे, परंतु एक लहान पक्ष असल्याने ते ते १५ दिवसांत गायब करतात. ऑडिट आणि योगदान अहवालातील फरकाबद्दल, सत्यवादी रक्षक पक्षाचे कार्यकारी प्रमुख बिरेन पटेल म्हणाले – मला हिशेबात फारसे काही समजत नाही. म्हणूनच सीएचे वकील अहवाल ठेवतात. यावेळी महानगरपालिका निवडणुकीत ८०-९० उमेदवार उभे करण्याची योजना आहे.
गुजरातमध्ये ५ वर्षात १० निनावी पक्षांना ४३०० कोटी रुपये मिळाले गुजरातमध्ये नोंदणीकृत १० निनावी राजकीय पक्षांना २०१९-२० ते २०२३-२४ या पाच वर्षांत ४३०० कोटी रुपये मिळाले. विशेष म्हणजे, या काळात गुजरातमध्ये झालेल्या तीन निवडणुकांमध्ये (२०१९, २०२४ मध्ये दोन लोकसभा आणि २०२२ मध्ये विधानसभा) या पक्षांनी फक्त ४३ उमेदवार उभे केले आणि त्यांना एकूण ५४,०६९ मते मिळाली.
गुजरात में कुछ ऐसी अनाम पार्टियां हैं जिनका नाम किसी ने नहीं सुना – लेकिन 4300 करोड़ का चंदा मिला!
इन पार्टियों ने बहुत ही कम मौकों पर चुनाव लड़ा है, या उनपर खर्च किया है।
ये हजारों करोड़ आए कहां से? चला कौन रहा है इन्हें? और पैसा गया कहां?
क्या चुनाव आयोग जांच करेगा – या फिर… pic.twitter.com/CuP9elwPaY
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 27, 2025
या पक्षांनी आणि त्यांच्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अहवालांवरून हे उघड झाले आहे. निवडणूक अहवालात त्यांनी खर्च फक्त ₹३९.०२ लाख दाखवला आहे, तर ऑडिट अहवालात ₹३५०० कोटी खर्च दाखवला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ७ ऑगस्ट रोजी मतदार यादीतील तफावतीबाबत २२ पानांचे, १ तास ११ मिनिटांचे सादरीकरण करत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. “मतांची चोरी होत आहे. आमच्याकडे पुरावे आहेत की निवडणूक आयोग चोरीत सहभागी आहे आणि हे काम भाजपसाठी केले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला होता.
या आरोपांनंतर ८ ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने राहुल गांधींना शपथपत्र सादर करण्याचे निर्देश दिले. आयोगाने स्पष्ट केले की, जर राहुल गांधींना आपले आरोप खरे वाटत असतील तर त्यांनी शपथपत्रावर स्वाक्षरी करून ते सादर करावे. अन्यथा, आपल्या दाव्यांबाबत देशाची माफी मागावी.
देशात नाममात्र मते मिळवणाऱ्या नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे (RUPP) उत्पन्न २०२२-२३ मध्ये २२३% ने वाढले. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, देशात २७६४ अमान्यताप्राप्त पक्ष आहेत. यापैकी ७३% पेक्षा जास्त (२०२५) पक्षांनी त्यांचे आर्थिक रेकॉर्ड सार्वजनिक केलेले नाहीत.