Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime: ठाण्यात गस्तीवरील पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; उपनिरीक्षक किसन भोईर यांचा मृत्यू

रात्रीची गस्त, गणपती बंदोबस्ताची जबाबदारी आणि अचानक पाठीमागून झालेला हल्ला... ठाण्यातील सुभाषनगर परिसरात घडलेल्या या घटनेने पोलिस दल हादरले आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिस उपनिरीक्षकावर हल्ला नेमका का करण्यात आला, याचा तपास सुरू आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 25, 2026 | 12:01 PM
Thane Crime: ठाण्यात गस्तीवरील पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; उपनिरीक्षक किसन भोईर यांचा मृत्यू

Thane Crime: ठाण्यात गस्तीवरील पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; उपनिरीक्षक किसन भोईर यांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • गस्तीवर असलेल्या PSI किसन भोईर यांच्यावर पाठीमागून हल्ला
  • गंभीर जखमी भोईर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू
  • आरोपी राजू वाल्मीकी पोलिसांच्या ताब्यात; हल्ल्याचे कारण तपासात
 

ठाणे: ठाण्यातील सुभाषनगर परिसरात रात्रीच्या गस्तीवर असलेल्या चितळसर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले पोलिस उपनिरीक्षक किसन भोईर (५६) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेमुळे ठाणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

गणपती बंदोबस्तादरम्यान घटना

गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. किसन भोईर हे आपल्या सहकाऱ्यांसह पीसीआर-१ वाहनातून चितळसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची गस्त घालत होते. पोखरण रोड क्रमांक दोन परिसरातील गांधीनगर आणि सुभाषनगर भागातून पोलिस पथक जात असताना ही घटना घडली.

हेही वाचा:Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प

पाठीमागून केला हल्ला

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, रेकॉर्डवरील आरोपी राजू वाल्मीकी (३०) याने भोईर यांच्यावर पाठीमागून बांबूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी भोईर हे पोलिस गणवेशात कर्तव्य बजावत होते. हल्ल्यानंतर भोईर यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणातील आरोपी राजू वाल्मीकी याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली आहे. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा:Crime News: काही तासांत तीन महिलांना लुटले; गोल्ड लोनच्या माध्यमातून चार लाखांची उचल, सहा गुन्हे उघडकीस

हल्ल्याचे कारण काय?

दरम्यान, पोलिस उपनिरीक्षकावर हल्ला करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपीने हल्ला का केला, त्यावेळी नेमके काय घडले आणि या घटनेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.  पोलिस उपायुक्त प्रशांत कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वरुडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या मृत्यूमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Web Title: Thane police sub inspector kisan bhoir attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Action on Police
  • Thane Crime
  • Thane News update

संबंधित बातम्या

Accident News: तरुणाला धडक दिल्यानंतर पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; क्षणात बाजूला उडी  अन्…
1

Accident News: तरुणाला धडक दिल्यानंतर पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; क्षणात बाजूला उडी अन्…

Kerala Police K9 Dogs: स्पोटक शोधण्यात होते पटाईत; पोलिसांच्या लाडक्या श्वानांना निवृत्तीनंतरचा मानाचा मुजरा!
2

Kerala Police K9 Dogs: स्पोटक शोधण्यात होते पटाईत; पोलिसांच्या लाडक्या श्वानांना निवृत्तीनंतरचा मानाचा मुजरा!

Thane Crime: ठाण्यात नात्याला काळिमा; धमकीमुळे तरुणी गप्प, पाच-सहा महिने भावांकडून वारंवार अत्याचार अन्…
3

Thane Crime: ठाण्यात नात्याला काळिमा; धमकीमुळे तरुणी गप्प, पाच-सहा महिने भावांकडून वारंवार अत्याचार अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.