Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तपासाच्या नावाखाली पोलिसांचे पर्यटन! अपर पोलिस आयुक्तांकडून गंभीर दखल; दोन वर्षासाठी…

"पोलिस तुमच्या सेवेसाठी" हे ब्रीदवाक्य मिरविणाऱ्या पुणे पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांनी मात्र गुन्ह्याच्या तपासालाच पर्यटनाची जोड देत पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारा प्रकार केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 30, 2026 | 12:24 PM
तपासाच्या नावाखाली पोलिसांचे पर्यटन! अपर पोलिस आयुक्तांकडून गंभीर दखल; दोन वर्षासाठी...

तपासाच्या नावाखाली पोलिसांचे पर्यटन! अपर पोलिस आयुक्तांकडून गंभीर दखल; दोन वर्षासाठी...

Follow Us
Follow Us:

पुणे : “पोलिस तुमच्या सेवेसाठी” हे ब्रीदवाक्य मिरविणाऱ्या पुणे पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांनी मात्र गुन्ह्याच्या तपासालाच पर्यटनाची जोड देत पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारा प्रकार केला आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्याचा तपासासाठी तक्रारदार महिलेला सोबत घेऊन साताऱ्यात गेलेल्या विश्रामबाग पोलिस ठाण्यातील महिला अधिकारी तसेच पोलिस अंमलदारांनी तपासाऐवजी दिवसभर पर्यटन, ढाब्यावर मेजवानी आणि पाहुणचाराचा आनंद लुटल्याचा धक्कादायक प्रकार विभागीय चौकशीत उघड झाला आहे. या गंभीर गैरवर्तनाची दखल घेत अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी तिघांची सलग दोन वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे.

 

महिला पोलिस उपनिरीक्षक स्वरूपा नाईकवाडे, पोलिस हवालदार श्रीहरी पाटील आणि महिला पोलिस कर्मचारी कोमल कांबळे अशी वेतनवाढ रोखण्यात आलेल्यांची नावे आहेत. विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्याचा तपास स्वरूपा नाईकवाडे यांच्याकडे होता. या गुन्ह्याच्या घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी ४ एप्रिल रोजी त्या तक्रारदार महिलेला सोबत घेऊन सातारा येथे गेल्या होत्या. मात्र तेथे पोहोचल्यानंतर स्थानिक शाहूपुरी पोलिस ठाण्याशी समन्वय साधून तपास करण्याऐवजी त्यांनी प्रथम एका प्रसिद्ध ढाब्यावर हजेरी लावल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. नंतर दुपारनंतर उशिरा शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोहोचून केवळ औपचारिकता पूर्ण केली.

धक्कादायक म्हणजे घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी गेले असताना आसपासच्या रहिवाशांची चौकशी, साक्षीदारांची माहिती किंवा घटनास्थळावरील तपासाची आवश्यक प्रक्रिया केली नाही. तरीही तपास पूर्ण करत स्थानिक पोलिसांत नोंद करून तातडीने पुण्याकडे रवाना होणे अपेक्षित होते. मात्र त्याऐवजी हे तिघे पोलिस साताऱ्याजवळील कास पठार व इतर पर्यटनस्थळांवर फिरत राहिले. नंतर एका महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या घरी जेवण करून उशिरा रात्री पुण्याकडे परतले. या संपूर्ण काळात तक्रारदार महिला आपल्या घरी आजारी आई एकट्या असल्याने वारंवार लवकर निघण्याची विनंती करत होती. मात्र तिच्या भावनांचा आणि परिस्थितीचा कोणताही विचार करण्यात आला नाही. पुण्यात पोहोचल्यानंतर महिलेला सुरक्षितपणे घरी पोहोचविण्याऐवजी सुरुवातीला स्वारगेट येथे सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलेने विरोध केल्यानंतर अखेर रात्री एकच्या सुमारास तिला नारायण पेठ पोलिस चौकीत एकटीला सोडण्यात आले. याप्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. विभागीय चौकशीत सर्व बाबी सिद्ध झाल्यानंतर अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी तिघांनाही दोन वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली. दरम्यान, तपासाच्या नावाखाली पर्यटन सहलीची सध्या जोरदार चर्चा पोलिस दलात सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : पार्थ पवार अन् कायनात धार यांचा पुण्यात साखरपुडा; शरद पवारांसह दिग्गज नेत्यांची हजेरी!

आदेशात नेमके काय नमूद?

अपर पोलिस आयुक्तांच्या आदेशात संबंधित तिघा पोलिस अधिकाऱ्यांवर अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहेत. “तुम्ही सातारा येथे जाऊन कोणताही सखोल तपास न करता केवळ मोघम स्वरूपाचा तपास केला. तपासाच्या नावाखाली पर्यटनस्थळे पाहण्यात वेळ घालवला. तक्रारदार महिलेला सोबत घेऊन तिच्या गुन्ह्याचा तपास करण्याऐवजी मौजमजा केली. तुमचे वर्तन बेजबाबदार, बेशिस्त, निष्काळजी आणि हलगर्जीपणाचे असून त्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन होईल, असे कृत्य तुम्ही केले आहे.”

Web Title: The additional police commissioner of pune has withheld the salary increments of three female police personnel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?
1

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
2

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

बीडकरांचं पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा; सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘अजितदादांचा शब्द पाळला’
3

बीडकरांचं पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा; सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘अजितदादांचा शब्द पाळला’

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त
4

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.