Parth Pawar Engagement: पार्थ पवार अन् कायनात धार यांचा पुण्यात साखरपुडा; शरद पवारांसह दिग्गज नेत्यांची हजेरी!
Parth Pawar & Kaynat Dhar Get Engaged : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विदयमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र, राज्यसभा खासदार पार्थ पवार आणि कायनात धार यांचा बुधवारी (२९ जुलै) पुण्यात साखरपुडा समारंभ झाला. साखरपुड्याच्या सोहळ्यासाठी सायंकाळी ६:३० ही शुभ वेळ ठरवण्यात आली होती. या सोहळ्यासाठी निवडक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा येरवडा येथील द रिट्झ-कार्लटन हॉटेलमध्ये पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ४० आमदार उपस्थित होते. पक्षाचे खासदार सुनील तटकरे आणि विविध पक्षांचे १५ खासदारही उपस्थित होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगपती मोहित कंबोज हेही उपस्थित होते. याशिवाय, साखरपुड्याच्या सोहळ्यासाठी काही विशेष पाहुण्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. शरद पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते साखरपुड्याला उपस्थित होते. पार्थ आणि कायनात यांचे लग्न पुढील वर्षी २७ फेब्रुवारी रोजी बारामतीमध्ये होणार आहे.
जानेवारीमध्ये विमान अपघातात दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच कुटुंबात आनंद परतला आहे. कुटुंब आता पार्थ पवारच्या साखरपुड्याच्या माध्यमातून आपले दुःख लपवण्याचा प्रयत्न करत आहे. लग्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी, करवीर पीठाच्या शंकराचार्यांचे मार्गदर्शन घेऊन हा साखरपुडा ठरवण्यात आला, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले.
पार्थ पवारची होणारी वधू, कायनात दारा, एक रिअल इस्टेट उद्योजिका आहे. ती मूळची चंदीगडची असून सध्या दिल्लीत राहते. कायनात एका पंजाबी-हिंदू कुटुंबातील आहे. तिने नवी दिल्लीतील ‘द ब्रिटिश स्कूल’मधून आपले शिक्षण पूर्ण केले असून ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स’मधून पदवी मिळवली आहे.






