Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

४८ दिवसांत तब्बल २१ किलो वजन घटलं! उच्च न्यायालय हादरले; ५९ वर्षीय कैद्याला अखेर वैद्यकीय जामीन

मुंबई उच्च न्यायालयाने एका ५९ वर्षीय  कैद्याला वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. तुरुंगात कोठडीत असताना अवघ्या ४८ दिवसांत या कैद्याचे २१ किलो वजन घटल्याची अत्यंत गंभीर दखल न्यायालयाने घेतली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 11, 2026 | 05:52 PM
४८ दिवसांत तब्बल २१ किलो वजन घटलं! उच्च न्यायालय हादरले; ५९ वर्षीय कैद्याला अखेर वैद्यकीय जामीन

४८ दिवसांत तब्बल २१ किलो वजन घटलं! उच्च न्यायालय हादरले; ५९ वर्षीय कैद्याला अखेर वैद्यकीय जामीन

Follow Us
Follow Us:

पुणे/आदित्य डुंबरे : मुंबई उच्च न्यायालयाने एका ५९ वर्षीय  कैद्याला वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. तुरुंगात कोठडीत असताना अवघ्या ४८ दिवसांत या कैद्याचे २१ किलो वजन घटल्याची अत्यंत गंभीर दखल न्यायालयाने घेतली. न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव यांच्या खंडपीठाने वजनातील या घटीला “चिंताजनक आणि धोकादायक” असे संबोधत, या परिस्थितीत कैद्याला पुढेही कोठडीत किंवा तुरुंगाच्या रुग्णालयात ठेवल्यास त्याच्या प्रकृतीला गंभीर आणि न सुधारणारा धोका निर्माण होऊ शकतो, असे स्पष्ट केले.

संबंधित कैद्यावर नोव्हेंबर २०२५ मध्ये पोटाची मोठी शस्त्रक्रिया झाली होती, ज्यामध्ये त्याच्या पोटाचा तब्बल ८० टक्के भाग काढण्यात आला होता. या शस्त्रक्रियेनंतर त्याला केवळ द्रवरूप किंवा अर्ध-द्रवरूप आहार घेण्याचा आणि विशेष काळजी घेण्याचा कडक वैद्यकीय सल्ला देण्यात आला होता. जून महिन्यात गुन्हेगारी कट रचणे, लैंगिक अत्याचार आणि महाराष्ट्राच्या जादटोणाविरोधी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांत त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, कोठडीत असताना त्याला वैद्यकीय सल्ल्यानुसार आवश्यक आहार आणि तज्ज्ञ डॉक्टरांची काळजी मिळू शकली नाही.

अटक झाल्यापासून या कैद्याची प्रकृती बिघडल्याने त्याला ससून, केईएम आणि जे. जे. रुग्णालयासह पाच वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सुरुवातीला येरवडा तुरुंग रुग्णालय आणि पुण्यातील ससून रुग्णालयात आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्याला जुलै अखेर उपचारासाठी मुंबईतील केईएम आणि जे. जे. रुग्णालयात हलवावे लागले. याशिवाय कैद्याला ‘टाइप-१ ऑटोइम्यून स्वादुपिंडाचा आजार’, यकृताचे आजार, क्षयरोग (TB) आणि स्टिरॉइड्सची गरज असणारी पिट्युटरी ग्रंथीची समस्या यांसारख्या इतर गंभीर आजारांचेही निदान झाले होते.

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी निरीक्षण नोंदवले की, तुरुंगातील परिस्थिती आणि तेथील प्रचंड गर्दी सर्वांनाच ठाऊक आहे. सामान्य कैद्याला तुरुंगाच्या बराकमध्ये किंवा रुग्णालयात मिळणारे उपचार आणि सामान्य नागरिकाला मिळणारे वैद्यकीय उपचार यांत मोठा गुणात्मक फरक असतो. कैद्याला त्याच्या आवडीच्या रुग्णालयात किंवा घरी संसर्गमुक्त वातावरणात ठेवून योग्य पुनर्वसन, आहाराचे व्यवस्थापन आणि डॉक्टरांचे नियमित मार्गदर्शन मिळणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा त्याच्या आरोग्याची स्थिती कधीही न सुधारण्याच्या टप्प्यावर पोहोचू शकते.

या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून उच्च न्यायालयाने ५९ वर्षीय कैद्याला वैद्यकीय जामीन मंजूर केला. सरकारी पक्षाने या जामिनाला विरोध करत तुरुंग रुग्णालयात उपचाराची सोय असल्याचा दावा केला होता; मात्र न्यायालयाने वैद्यकीय अहवाल आणि डॉक्टरांचे मत ग्राह्य धरून जामीन दिला. न्यायालयाने जामीन मंजूर करताना कैद्याला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आणि तपास अधिकाऱ्याला पूर्वसूचना देऊन त्याच्या घरी किंवा रुग्णालयात भेट देऊन तपास करण्याची परवानगी देण्याचे निर्देश दिले आहेत.

हे सुद्धा वाचा : आईवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या

Web Title: The bombay high court has granted bail to a prisoner on medical grounds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • Court
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Seven Eleven School अडचणीत! पर्युषण काळातील आहार संदेशाची दखल; प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस
1

Seven Eleven School अडचणीत! पर्युषण काळातील आहार संदेशाची दखल; प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस

SIMI म्हणजे नेमकं काय? दहशतवादी वडिलांना भेटण्यासाठी बनावट पासपोर्ट, सौदी प्रवास; मुंब्र्यातून एका मुलीला ATSने पकडलं
2

SIMI म्हणजे नेमकं काय? दहशतवादी वडिलांना भेटण्यासाठी बनावट पासपोर्ट, सौदी प्रवास; मुंब्र्यातून एका मुलीला ATSने पकडलं

Shevgaon Farmers: शेवगावात पावसाळ्यातच दुष्काळाचे सावट! तीन महिन्यांपासून पाऊस गायब; पिके करपली, शेतकरी हवालदिल
3

Shevgaon Farmers: शेवगावात पावसाळ्यातच दुष्काळाचे सावट! तीन महिन्यांपासून पाऊस गायब; पिके करपली, शेतकरी हवालदिल

Namira Khan Mumbra Case:  १९ वर्षीय नमीरा खान ATSच्या रडारवर; वडिलांचे इंडियन मुजाहिदीनशी कनेक्शन
4

Namira Khan Mumbra Case: १९ वर्षीय नमीरा खान ATSच्या रडारवर; वडिलांचे इंडियन मुजाहिदीनशी कनेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.