
आधी लोखंडी पाइप आणि विटांनी बेदम मारहाण, नंतर मृतदेह जाळला! छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
गोलटगाव येथील विशाल भास्कर खुळे (वय ३२) यांनी २४ ऑक्टोबर रोजी करमाड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांचे चुलते इंद्रजित बाबुराव खुळे (वय ५१) हे २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घरातून निघाल्यानंतर बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घेण्याबाबत तक्रारदाराने पोलिसांकडे विनंती केली होती. त्यानुसार करमाड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान साक्षीदार चंद्रकांत बाबुराव खुळे यांनी दिलेल्या माहितीतून इंद्रजित खुळे यांना काही व्यक्तींनी करमाड औद्योगिक वसाहतीतील सी-५ प्लॉट क्रमांक ५ येथे नेल्याचे समोर आले. तेथे त्यांचा खून करण्यात आला.
हे सुद्धा वाचा : फिनिक्स मॉल परिसरात मध्यरात्री थरार! सिमेंटचा गट्टू तरुणाच्या डोक्यात घातला अन्…
एका आरोपीचा शोध सुरू
तपासात उत्तर प्रदेशातील प्रियम वीरेंद्रसिंग कुशवाह (वय १९, रा. शंभरपुर्वा, ता. तिरवा, जि. कनोज, राज्य. उत्तरप्रदेश) आणि रवी आसाराम कुशवाह (वय २१, रा. ठठिया, जि. कनोज, राज्य. उत्तरप्रदेश) यांचा करमाड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने उत्तरप्रदेशात जात दोघांचा शोध घेऊन त्यांना उत्तर प्रदेशातून ताब्यात घेत अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील अन्य फरार आरोपी ऋषभ श्रीवास्तव याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात रवाना करण्यात आले आहे.
पुण्यात ऐन दिवाळीत गुन्हेगारीचा थरार!
कोंढवा बुद्रुक परिसरातील साळवे गार्डनजवळ वैमनस्यातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (६ नोव्हेंबर) घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शुभम शरद शिंदे (वय २७, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी रतन विठ्ठल खत्री (वय २४), सोमा गायकवाड, पंकज तिवारी, आकाश जमादार यांना अटक करण्यात आली. तर बंटी म्हस्के, समीर विद्यागज, संघर्ष सावंत, शैलेश भंगे, तन्मय सोनवणे यांच्यासह दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसंच्या माहितीनुसार, शुभम शिंदे हा पानपट्टी चालवितो. आरोपींशी त्याच्या वाद झाला होता. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास कोंढव्यातील साळवे गार्डनजवळ आरोपींनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. सहायक पोलीस निरीक्षक नेवसे तपास करत आहेत.
Ans: शेंद्र एमआयडीसी आणि डीएमआयसी परिसरातील करमाड औद्योगिक वसाहतीतील सी-५ प्लॉट क्रमांक ५ येथे इंद्रजित खुळे यांचा खून करण्यात आला.
Ans: आरोपींनी लोखंडी पाइप आणि सिमेंटच्या विटांनी मारहाण करून इंद्रजित खुळे यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह चेंबरमध्ये टाकून जाळला.
Ans: पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रियम कुशवाह आणि रवी कुशवाह या दोघांना अटक केली आहे. तर फरार आरोपी ऋषभ श्रीवास्तव याचा शोध सुरू आहे.