Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलेवर चाकूने वार करुन अत्याचार; न्यायालयाने नराधमाला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून जखमी अवस्थेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने जन्मठेपेसह ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा निकाल दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 04, 2025 | 11:57 AM
५ उच्च न्यायालयांमध्ये १६ न्यायाधीशांची नियुक्ती, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी

५ उच्च न्यायालयांमध्ये १६ न्यायाधीशांची नियुक्ती, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून जखमी अवस्थेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने जन्मठेपेसह ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा निकाल दिला आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. फेब्रुवारी २०१५ मध्ये घडलेल्या या घटनेत आरोपीने अत्याचार केल्यानंतर तिच्या अंगावरील सोने लुटून पळ काढला होता. राजेश मनीराम यादव (रा. वाकडेवाडी, मुळ रा. उत्तर प्रदेश) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ही घटना शिवाजीनगर येथील अनुतेज अथर्व सोसायटीत घडली होती. याप्रकरणी महिलेच्या मुलाने शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली होती.

महिला घरात एकटीच राहत होती. त्याचा फायदा घेऊन यादवने तिच्याशी ओळख वाढविली. घटनेच्या दिवशी महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने तो घरात आला. मालिश करण्यास सुरवात केली. यावेळी, त्याने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यास महिलेने विरोध केला असता त्याने रागाच्या भरात तिचे तोंड दाबले. नंतर भाजी कापायच्या सुरीने तिच्या गळ्यावर वार केले. हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असताना त्याने तिच्यावर अत्याचार केला. यादरम्यान, महिलेचा मृत्यू झाला. अत्याचारानंतर पळून जाताना त्याने महिलेच्या कानातील सोन्याचे टॉप्स, पायातील चांदीचे पैंजण, मोबाईल तसेच ३ हजार रोख चोरली. महिलेच्या घराचे दार उघडे असल्याने शेजारचे तिच्या घरात आले. तेव्हा त्यांना महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.

पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली. तपास पुर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याचे कामकाज सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. लीना पाठक यांनी पाहिले. त्यांनी १६ साक्षीदार तपासले. युक्तिवादादरम्यान वैद्यकीय अहवाल, आरोपीच्या बोटांचे ठसे हा पुरावा महत्त्वाचा ठरला. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा युक्तिवाद अ‍ॅड. पाठक यांनी केली. न्यायालयाने तो मान्य करत आरोपीला जन्मठेपेसह ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

हे सुद्धा वाचा : भरदुपारी अल्पवयीन मुलाचा हात मनगटापासून कापला! रक्तरंजित हल्ल्याने परिसरात तणाव

Web Title: The court has sentenced the accused who tortured the woman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 11:56 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

ही कसली क्रूरता? भटक्या कुत्र्याला पकडले, हवेत गरगर फिरवले अन्…; PCMC मधील Video Viral
1

ही कसली क्रूरता? भटक्या कुत्र्याला पकडले, हवेत गरगर फिरवले अन्…; PCMC मधील Video Viral

अरे, आम्ही प्रेम पण करायचे नाही का? Baramati मध्ये प्रेमीयुगुलावर कोयत्याचा धाक दाखवला अन्…
2

अरे, आम्ही प्रेम पण करायचे नाही का? Baramati मध्ये प्रेमीयुगुलावर कोयत्याचा धाक दाखवला अन्…

Crime News : पोलिसांची दोन गुन्हेगारांविरुध्द कारवाई! नांदेड जिल्ह्यात प्रवेशबंदी; ६ महिन्यांसाठी हद्दपार
3

Crime News : पोलिसांची दोन गुन्हेगारांविरुध्द कारवाई! नांदेड जिल्ह्यात प्रवेशबंदी; ६ महिन्यांसाठी हद्दपार

व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण नीरा पोलिसांच्या सर्जिकल नाकाबंदीत सुखरूप सुटका
4

व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण नीरा पोलिसांच्या सर्जिकल नाकाबंदीत सुखरूप सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.