Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nasrapur Case : नसरापूर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, अंतिम युक्तिवाद पुर्ण; पुढील आठवड्यात…

पुण्यातील नसरापूर येथे १ मे रोजी चिमुरडीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली होती. या प्रकरणाची प्रकरणाची सुनावणी पुर्ण झाली आहे. पुढील आठवड्यात न्यायालयाकडून निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 21, 2026 | 01:05 PM
नसरापूर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, अंतिम युक्तिवाद पुर्ण; पुढील आठवड्यात...

नसरापूर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, अंतिम युक्तिवाद पुर्ण; पुढील आठवड्यात...

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातील नसरापूर येथे १ मे रोजी चिमुरडीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली होती. याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची प्रकरणाची सुनावणी पुर्ण झाली असून, पुढील आठवड्यात न्यायालयाकडून निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. सरकार आणि बचाव पक्षाकडून शनिवारी अंतिम युक्तिवाद पुर्ण केला आहे. या प्रकरणाचा पोलीसांनी जलदगतीने तपास करून १ हजार १०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. नियमित होणार्‍या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे १६ दिवसांत एकून ५५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. शुक्रवारी (दि. १९) आरोपीचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पुर्ण झाली आहे.

 

अंतिम युक्तीवादात आरोप सिद्ध होत असल्याचा दावा

शनिवारी (दि. २०) झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारी पक्ष आणि बचाव पक्षातर्फे अंतिम युक्तिवाद करण्यात आला. यावेळी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मिसर यांनी सविस्तर युक्तिवाद केला. यावेळी अ‍ॅड. मिसर यांनी भक्कम पुरावे, तांत्रिक दस्तऐवज आणि वैद्यकीय अहवालांची मांडणी करत आरोपपत्रातील सर्व आरोप सिद्ध होत असल्याचा दावा केला.

चिमुकली ३९ मिनिटे नराधमाच्या ताब्यात

घटनेच्या दिवशी आरोपी भीमराव कांबळे हा पीडितेला दुपारी सुमारे सव्वातीन वाजता घटनास्थळाकडे घेऊन जाताना सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजून ५१ मिनीटांनी तो घटनास्थळावरून एकटाच परतत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. यावरून तब्बल ३९ मिनीटे चिमुरडी आरोपीच्या ताब्यात होती. या ३९ मिनीटांच्या कालावधीत आरोपीने तिच्यावर पाशवी अत्याचार करून तिचा खून करत मृतदेह लपवून ठेवला, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मिसर यांनी केला. आरोपीने हे कृत्य रागाच्या भरात न करता, अतिशय थंड डोक्याने, विचारपूर्वक आणि केवळ वासनेपोटी केले आहे. त्यामुळे त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही अ‍ॅड. मिसर यांनी अंतिम युक्तिवादात केली.

आरोपीच्या खोटेपणाचा पर्दाफाश

दिनांक १९ ला विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान आरोपीने स्वतःचा बचाव करताना हे आरोप फेटाळून लावले होते. दरम्यान, अ‍ॅड. मिसर यांनी सक्षम वैद्यकीय दाखले आणि डीएनए प्रोफाइलिंगच्या वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग असल्याचा दावा केला. तसेच, पीडित मुलगी ३९ मिनीटे आरोपीच्या ताब्यात होती या काळात त्याने केलेल्या क्रूरतेचा कळस न्यायालयासमोर सरकारपक्षाने मांडला. पीडितेच्या मृत्यूनंतरही आरोपीने अत्यंत थंड डोक्याने तिच्या मृतदेहावर अत्याचार केले. घटनेनंतरची आरोपीची ‘बॉडी लँग्वेज’ (शारीरिक हावभाव), त्याचे वास्तव आणि त्याला यापूर्वीच्या खटल्यांमुळे असलेले कायद्याचे ज्ञान, याचा वापर त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी केल्याचे अ‍ॅड. मिसर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

हे सुद्धा वाचा : चार धरणांत केवळ 5.23 टीएमसी पाणीसाठा; नीरा खोऱ्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

सरकार पक्षाने सादर केली भक्कम पुराव्यांची साखळी

सीसीटीव्ही आणि रेकी : आरोपीने गुन्हा करण्यापूर्वी घटनास्थळाची आणि आजूबाजूच्या घरांची कशी रेकी केली होती?, हे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दाखवून देण्यात आले.

साक्षीदारांचे जबाब : मुख्य साक्षीदार आणि बाल साक्षीदार यांनी नोंदवलेले महत्त्वपूर्ण भक्कम जबाब.

वैज्ञानिक व रासायनिक पुरावे : विविध घटनास्थळ पंचनामे, आरोपीची ओळख परेड, हस्तगत मुद्देमाल आणि रासायनिक विश्लेषणाचा अहवाल. तपासकामातील ‘चेन ऑफ कस्टडी’ अचूक असल्याने पुराव्यांशी कोणतीही छेडछाड झाली नसल्याचे सिद्ध करण्यात आले.

Web Title: The court is set to deliver its verdict soon in the nasrapur murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्
1

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड
2

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’
3

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे
4

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.