Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navarashtra Special: शब्दांची गरज नाही, हातांची जादूच बोलकी! मूकबधिर दाम्पत्याने कलेतून उभा केला व्यवसाय

Navarashtra Special: ग्राहकांना वस्तू दाखवताना, त्यांच्या आवडी समजून घेताना आणि एकमेकांशी खुणांच्या भाषेत संवाद साधताना या दाम्पत्याचा आत्मविश्वास सहज जाणवतो. प्रत्येक वस्तूमागे त्यांची कल्पकता, मेहनत आणि बारकाई दिसून येते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 03, 2026 | 02:35 AM
कलाकृतींच्या माध्यमातून व्यक्त होतेय जिद्द, कल्पकता आणि आत्मविश्वास

कलाकृतींच्या माध्यमातून व्यक्त होतेय जिद्द, कल्पकता आणि आत्मविश्वास

Follow Us
Follow Us:
  • शब्द नाही कला बोलते; ११ वर्षांपासून हातांनी रंगवताहेत स्वप्नांचे जग
  • मूकबधिर दाम्पत्याची बालगंधर्व येथील प्रदर्शनात हस्तकलेची अनोखी दुनिया
  • कलाकृतींच्या माध्यमातून व्यक्त होतेय जिद्द, कल्पकता आणि आत्मविश्वास
पुणे/Navarashtra Special: बालगंधर्व रंगमंदिर येथे पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित प्रदर्शनात विविध वस्तूंचे स्टॉल, खरेदीसाठी झालेली गर्दी आणि विक्रेत्यांची लगबग सुरू होती. या सगळ्या गोंगाटात एका स्टॉलने मात्र लक्ष वेधून घेतले. येथे शब्दांचा संवाद नव्हता, तर हातांच्या हालचालींतून भावना व्यक्त होत होत्या. मूकबधिर दाम्पत्याने आपल्या हातांनी साकारलेल्या कलाकृतींच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आंबेगाव बुद्रुक येथील शीतल कवठेकर या गेल्या ११ वर्षांपासून हस्तकला आणि विविध कलात्मक वस्तूंच्या निर्मितीमध्ये कार्यरत आहेत. ‘विश्व एक्सक्लुझिव्ह आर्ट गॅलरी’ या नावाने त्या स्वतःच्या कलावस्तूंची निर्मिती आणि विक्री करतात. त्यांच्यासोबत त्यांचे पतीही या कामात सहभागी असतात. ऐकू आणि बोलता येत नसले, तरी या मर्यादांना आपल्या कलेच्या आड येऊ न देता त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे.

त्यांच्या स्टॉलवर आकर्षक नेमप्लेट, की-होल्डर, फ्रिज मॅग्नेट, रिंग प्लेटर, गणपती सजावटीच्या वस्तू, दिवाळीच्या पणत्या, पारंपरिक रांगोळीच्या सजावटीच्या वस्तू अशा विविध हस्तनिर्मित कलाकृती पाहायला मिळतात. याशिवाय ज्यूटच्या पिशव्यांवर हाताने रंगकाम करून त्या आकर्षक बनवतात. ग्राहकांच्या आवडीनुसार रंग, आकार आणि संकल्पनेनुसार वैयक्तिक डिझाइनही तयार करून देतात. लग्नसमारंभ, कॉर्पोरेट भेटवस्तू आणि सणांसाठी विशेष ऑर्डरही स्वीकारतात.

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं बंधनकारक आहे का? सोन्याऐवजी या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ

ग्राहकांना वस्तू दाखवताना, त्यांच्या आवडी समजून घेताना आणि एकमेकांशी खुणांच्या भाषेत संवाद साधताना या दाम्पत्याचा आत्मविश्वास सहज जाणवतो. प्रत्येक वस्तूमागे त्यांची कल्पकता, मेहनत आणि बारकाई दिसून येते.त्यांच्याकडे संवादासाठी शब्द नाहीत; मात्र प्रत्येक कलाकृती काहीतरी सांगते. आवाजाच्या जगात शांतपणे उभे राहून आपल्या कर्तृत्वाची ओळख निर्माण करणारे हे दाम्पत्य खऱ्या अर्थाने जिद्द आणि आत्मनिर्भरतेचा सुंदर आदर्श ठरते.

शीतल कवठेकर यांच्या हस्तकलेतील कलावस्तू

आकर्षक आणि वैयक्तिक डिझाइनच्या नेमप्लेट
सजावटीचे की-होल्डर
फ्रिज मॅग्नेट आणि स्टिकी नोट्स
रिंग प्लेटर डिझाइन
गणपती सजावटीच्या वस्तू
दिवाळीसाठी सजावटीच्या पणत्या
पारंपरिक रांगोळीच्या सजावटीच्या वस्तू

Diwali 2026: दिवाळीच्या प्रकाशपर्वासाठी मळेवाड सज्ज! सिंधुदुर्ग ते गोव्यापर्यंत अविनाश कुंभार यांच्या पणत्यांना पसंती

हाताने रंगकाम केलेल्या ज्यूटच्या पिशव्या
लग्नसमारंभासाठी खास भेटवस्तू
कॉर्पोरेट गिफ्ट्स आणि सानुकूलित भेटवस्तू
ग्राहकांच्या आवडीनुसार रंग, आकार आणि संकल्पनेवर आधारित विशेष कलावस्तू

Web Title: Navarashtra special diwali 2026 pune shital kavthekar deaf and mute create own business tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Diwali 2026
  • navarashtra special
  • pune news

संबंधित बातम्या

‘हर भक्त श्री राम तक’! अंध भक्तांसाठी उभारणार श्रद्धेचा पूल; ITC Mangaldeep चा अनोखा डिजिटल उपक्रम
1

‘हर भक्त श्री राम तक’! अंध भक्तांसाठी उभारणार श्रद्धेचा पूल; ITC Mangaldeep चा अनोखा डिजिटल उपक्रम

Badminton कोर्टवर चुरशीच्या लढती; मुलांमध्ये रायगड, तर मुलींमध्ये…; सेमीफायनलमध्ये कोणाचा प्रवेश?
2

Badminton कोर्टवर चुरशीच्या लढती; मुलांमध्ये रायगड, तर मुलींमध्ये…; सेमीफायनलमध्ये कोणाचा प्रवेश?

Baramati News : पावसाच्या संकटाने प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा मैदानात
3

Baramati News : पावसाच्या संकटाने प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा मैदानात

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं बंधनकारक आहे का? सोन्याऐवजी या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ
4

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं बंधनकारक आहे का? सोन्याऐवजी या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.