Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; तब्बल अडीच कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बॅंकॉकहून पुण्यात विमानाद्वारे आलेल्या एका बेवारस बॅगेत तब्बल साडे एक्केवीस किलो हायड्रोपोनिक गांजा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत तब्बल अडीच कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 22, 2026 | 12:30 AM
पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; तब्बल अडीच कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; तब्बल अडीच कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

Follow Us
Follow Us:

पुणे : बॅंकॉकहून पुण्यात विमानाद्वारे आलेल्या एका बेवारस बॅगेत तब्बल साडे एक्केवीस किलो हायड्रोपोनिक गांजा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत तब्बल अडीच कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी रॅकेटचा हात असल्याचे सांगितले जात असून, विमानतळावर सीमाशुल्क (कस्टम) विभागाने मोठी कारवाई करत हा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे.

 

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री बँकॉकहून पुणे विमानतळावर आलेल्या विमानातील प्रवाशांनी आपापले सामान ताब्यात घेतले. मात्र, एक बॅग दीर्घकाळ कन्व्हेयर बेल्टवर पडून होती. बराच वेळ उलटल्यानंतरही कोणीही त्या बॅगेवर दावा न केल्याने कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी तत्काळ बॅग ताब्यात घेऊन तिची तपासणी केली. तपासणीदरम्यान बॅगेतून मोठ्या प्रमाणात हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ सापडल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी

अधिकाऱ्यांनी सांगितले की, हायड्रोपोनिक गांजा हा सामान्य गांजाच्या तुलनेत अधिक महाग आणि अधिक नशा देणारा मानला जातो. विशेष तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नियंत्रित वातावरणात त्याची लागवड केली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला मोठी मागणी असून, त्याची तस्करी संघटित गुन्हेगारी टोळ्यांकडून केली जाते.

हे सुद्धा वाचा : व्यावासयिक विशाल अगरवालच्या अडचणीत वाढ? जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव

सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी सुरू

दरम्यान, ही बॅग नेमकी कोणत्या प्रवाशाची होती आणि भारतात ती कोणाकडे पोहोचविण्याचा कट रचला होता, याचा शोध कस्टम विभाग घेत आहे. यासाठी संबंधित विमान कंपनीचे रेकॉर्ड, सामानावरील टॅग, प्रवाशांची माहिती तसेच विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : गणपतीपुळे समुद्रात पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे 5 जण बुडाले, पर्यटनाचा आनंद क्षणात विरला

Web Title: The customs department has seized hydroponic cannabis at pune airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Drugs Case
  • Pune Airport

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.