Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पलूसमध्ये शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून; अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

Education Director Killed : पं. विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे संचालक संजय प्रभाकर परांजपे (वय ६०, रा. मारुती मंदिराजवळ, पलूस) यांचा अज्ञातांनी निघृण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 19, 2026 | 06:16 PM
पलूसमध्ये शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून; अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

पलूसमध्ये शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून; अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

Follow Us
Follow Us:
  • अज्ञातांच्या हल्ल्याने शहर हादरले
  • पोलिसांकडून तपास सुरू
  • अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला
पलूस येथील पं. विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे संचालक संजय प्रभाकर परांजपे (वय ६०, रा. मारुती मंदिराजवळ, पलूस) यांचा अज्ञातांनी निघृण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. त्यांच्या स्वतःच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे पलूस शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू ठेवली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मारुती मंदिराजवळ परांजपे यांचा जुना वाडा असून त्यालगतच ‘गजानन सदन’ हे त्यांचे नवीन अपार्टमेंट आहे. गुरुवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता ते श्री धोंडीराज महाराज मंदिरात दर्शनासाठी जातो असे सांगून घराबाहेर पडले. दर्शन करून परतल्यानंतर त्यांनी अपार्टमेंटमधील पार्किंगमध्ये मोटारसायकल उभी केली. त्यानंतर काही वेळातच अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आधी माझी प्रेयसी हो नाही तर…; तंत्र मंत्राने गंडा घालून महिलेसोबत नको ते केल! ए टू झेड स्टोरी जशीच्या तशी

दरम्यान, ते बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोन वाजत असतानाही प्रतिसाद मिळत नसल्याने मुलगा मंदार परांजपे पार्किंगकडे गेला असता त्याला रक्ताचा सडा दिसला. पुढे जाऊन पाहिले असता संजय परांजपे हे गंभीर जखमी अवस्थेत पार्किंगमधील कोपऱ्यातील जागेत पडलेले आढळले.

मंदार यांनी आरडाओरडा करताच शेजारी व अपार्टमेंटमधील रहिवासी घटनास्थळी जमा झाले. त्यांनी तात्काळ पलूस पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

संजय परांजपे हे पं. विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे यांचे धाकटे बंधू होते. शांत, मितभाषी आणि संयमी स्वभावासाठी ओळख असलेल्या परांजपे यांच्या हत्येमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती, तर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, हा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला, याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Crime News: ऊसतोडीच्या पैशांच्या वादातून शेतकऱ्याचे अपहरण; चाकूने वार करत 40 हजारांची खंडणी उकळली, अन्…

Web Title: The director of an educational institution was brutally murdered in palus a body is found in a pool of blood in the parking lot of an apartment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • education
  • Sangli

संबंधित बातम्या

Kotak Kanya Scholarship: कोटक एज्युकेशन फाऊंडेशनकडून ‘या’ विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती जाहीर; जाणून घ्या पात्रता!
1

Kotak Kanya Scholarship: कोटक एज्युकेशन फाऊंडेशनकडून ‘या’ विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती जाहीर; जाणून घ्या पात्रता!

AI in Management Education: एआयच्या युगात व्यवस्थापन शिक्षणात कसे बदल होत आहेत? जाणून घ्या सविस्तर!
2

AI in Management Education: एआयच्या युगात व्यवस्थापन शिक्षणात कसे बदल होत आहेत? जाणून घ्या सविस्तर!

Education Loan: उच्च शिक्षणासाठी आता पैशांची अडचण नाही! केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळते विना-तारण कर्ज
3

Education Loan: उच्च शिक्षणासाठी आता पैशांची अडचण नाही! केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळते विना-तारण कर्ज

Business Management: NMIMS एमबीए प्रवेश प्रक्रिया कधीपासून होणार सुरू? जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत आणि कॅम्पसची सविस्तर माहिती!
4

Business Management: NMIMS एमबीए प्रवेश प्रक्रिया कधीपासून होणार सुरू? जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत आणि कॅम्पसची सविस्तर माहिती!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.