
टोळ्यांच्या वैरातून पुणे शहर पुन्हा रक्तरंजित! आंदेकर- गायकवाड टोळ्यांमधील संघर्षाच्या दुसऱ्या प्रकरणाने खळबळ
माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खूनाचा बदला म्हणून दुसराही खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तत्पुर्वी आंदेकर- गायकवाड टोळीतील टोकाच्या संघर्षाची सुरूवात ऑक्टोंबर २०२३ मध्ये पेठेत झालेल्या अनिकेत दुधभाते आणि निखील आखाडे यांच्यावरील हल्ल्यानंतर झाली. आंदेकर टोळीकडून झालेल्या हल्यात निखील आखाडेचा मृत्यू झाला. यानंतर गायकवाड टोळीकडून सातत्याने आंदेकर टोळीवर बदला घेण्यासाठी डाव टाकण्यात येत होता. ६ वेळा प्लॅन फसल्यानंतर १ ऑक्टोंबर २०२४ रोजी गायकवाड टोळीने प्लॅन यशस्वी करत वनराज आंदेकर याचा खून केला. वास्तवात, या खूनाने आंदेकर टोळीला जबर धक्का बसला. विशेषत: टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याला. नंतर त्याने गुन्हेगारी जगतात शहराला मी, ‘रक्तरंजित’ आणि ‘बदला’ कसा असतो हे दाखवेल, अशी भूमिका घेतली होती. तसेच, टोळीतील काही सदस्यांनी ‘शपथा’ घेतल्या होत्या. तत्पुर्वी वनराज टार्गेटवर असल्याची कुणकुण पोलिसांना होती. त्यासंदंर्भाने पोलिसांनी उपाययोजना व संबंधितांना ‘सावध’ राहण्याचे सांगितले देखील होते.
आंदेकर टोळीकडून वनराजच्या खूनाचा बदला घेण्यासाठी मोठी प्लॅनिंग केल्याचे आता दुसऱ्या खूनानंतर स्पष्ट होत आहे. गुन्हेगारी व पोलिस दलात देखील याची पुर्व कल्पना होती. पण, निशाण्यावर कोण, असा प्रश्न होता. मात्र, आता तेही स्पष्ट झाले आहे. वनराजच्या खूनातील आरोपींच्या जवळचे किंवा घरातील व्यक्तींवर आंदेकरांकडून निशाना साधला जात असल्याचे दुसऱ्या खूनानंतर समोर आले आहे. आंदेकरांच्या टोळीतील पण, पोलिसांकडे नोंद नसलेल्या समर्थकांनी शनिवारी सागर काळे याचा खून करून ‘बदला’ घेत गँगवॉरला नव्या टप्प्यावर नेले. सागरचा भाऊ समीर काळे याने वनराजच्या आरोपींना पिस्तूल पुरविले होते. त्यामुळे हा खून झाला. यापूर्वी बंडू आंदेकरचा जावई आणि वनराजच्या खुनातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा गोळ्या झाडून खून झाला होता. दोन महिन्यांत दोन खून आणि ते सर्व एका वैराच्या पायावर उभ्या असल्याने पुण्यातील हे गँगवार कोणत्या थराला जाणार असा प्रश्न यानिमित्ताने आहे. पोलिसांना देखील सुरू झालेले हे गँगवार थांबविता येईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खऱ्या अर्थाने पेठेतील तिहेरी संघर्षात आंदेकर टोळी, सोमनाथ गायकवाड टोळी आणि सुरज ठोंबरे गट हे तीन गट सतत एकमेकांवर हल्ले चढवत आहेत.
हे सुद्धा वाचा : गणेश काळे खून प्रकरणी मोठी अपडेट; तपासातून धक्कादायक माहिती समोर
नातेवाईक टार्गेटवर
दोन खूनानंतर वनराज याच्या खूनातील आरोपींचे नातेवाईक, कुटूंबिय व जवळचे टार्गेटवर आहेत, हे स्पष्ट होत असले तरी ते रोखणे पोलिसांना आव्हान ठरत आहे. तरीही एक मोठा कट पुणे पोलिसांच्या सावधगिरीने वाचला होता.
आंदेकर गटाचा प्रभाव वारजे, सिंहगड रोड आणि धायरी परिसरात तर गायकवाड गटाचा दबदबा कात्रज आणि अंबेगाव भागात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. सोशल मीडियावरून एकमेकांना आव्हाने, “रिल्स”द्वारे प्रतिष्ठा टिकविण्याचे प्रयत्न आणि मागील खुनाचा ‘बदला’ घेण्याच्या गर्जना सर्वांचा शेवट रक्तपाताचा होताना दिसत आहे.
टोळ्यांचा इतिहास आणि संघर्षाचा मागोवा
वनराज आंदेकर टोळी
| वर्ष | घटना | संबंधित टोळी |
|---|---|---|
| २०२३ | निखील आखाडेचा खून | आंदेकर टोळी |
| २०२४ | वनराज आंदेकरचा खून | गायकवाड गट |
| २०२५ | आयुष कोमकरचा खून | आंदेकर टोळी |
| २०२५ | सागर काळेचा खून | आंदेकर टोळी |