Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई

एफडीएकडून राज्यभरात कारवाईचा धडाका सुरुच आहे. सणासुदीच्या काळातही अन्न भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई सुरू केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 18, 2026 | 01:31 PM
स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्...; 'एफडीए'ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई

स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्...; 'एफडीए'ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

पुणे : एफडीएकडून राज्यभरात कारवाईचा धडाका सुरुच आहे. सणासुदीच्या काळातही अन्न भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई सुरू केली आहे. पुण्यातील द न्यू पूना क्लब लिमिटेडवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. क्लबच्या स्वयंपाकघराची तपासणी करताना अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळून आल्याने FDA ने क्लबचा अन्न परवाना तात्काळ निलंबित केला आहे.

 

कॅम्प परिसरातील क्लबमध्ये तपासणीदरम्यान झुरळे आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव तसेच अन्नसुरक्षा नियमांशी संबंधित अनेक उल्लंघनं आढळल्याची माहिती FDA अधिकाऱ्यांनी दिली आहे. FDA च्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान न्यू पूना क्लबच्या किचनमध्ये स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचं आढळून आलं. तपासणीदरम्यान जिवंत झुरळे आणि इतर कीटक आढळले. तसेच अन्नसुरक्षा नियमांमधील Schedule 4 मधील विविध तरतुदींचं उल्लंघन झाल्याचं FDA ने नमूद केलं आहे.

स्वयंपाकघरातील अस्वच्छ परिस्थितीमध्ये उंदराची विष्ठा, साचलेलं पाणी, तेलकट पृष्ठभाग तसेच फ्रीजजवळील अस्वच्छ शौचालयासारख्या बाबींचाही समावेश आहे. त्यामुळे अन्न तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या निकषांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. FDA ने या परिस्थितीचा सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंध असल्याचं नमूद करत क्लबचा अन्न परवाना तात्काळ निलंबित केला आहे.

हे सुद्धा वाचा : अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…

विशेष तपासणी मोहीम

पुणे FDA विभागाने आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 10 ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत विशेष अन्नसुरक्षा तपासणी मोहीम राबवली. पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण 14 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. या तपासणीत लेबलिंगमधील त्रुटी, दिशाभूल करणारी माहिती आणि भेसळीचा संशय अशा कारणांमुळे तब्बल 56.36 लाखांचा खाद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

गणेशोत्सवापूर्वी एफडीएकडून पनीर, खवा जप्त

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनीर, खवा आणि माव्याची मागणी वाढण्यापूर्वीच अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बुधवार पेठ परिसरात धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे १० हजार किलो पनीर आणि पाच हजार किलो खवा, असा एकूण १५ हजार किलो साठा जप्त करण्यात आला. जप्त साठ्यात तीन कंटेनरमधून आणलेल्या पनीरचा समावेश आहे. या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

Web Title: The fda has taken major action against the new poona club in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • FDA Action
  • pune news
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला ‘हा’ नवीन प्लॅन
1

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला ‘हा’ नवीन प्लॅन

Mumbai FDA Action : तुकाराम मुंढेंचा दणका! नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह 7 ठिकाणांचे परवाने निलंबित
2

Mumbai FDA Action : तुकाराम मुंढेंचा दणका! नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह 7 ठिकाणांचे परवाने निलंबित

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
3

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
4

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.