Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांनो आधी इकडे लक्ष द्या! ‘हा’ मुख्य पूल वाहतुकीसाठी राहणार बंद; पण कारण तरी काय?

Bhide Bridge: पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. या कालावधीत नागरिकांना होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल पुणे मेट्रो प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 17, 2026 | 09:06 PM
19 नोव्हेंबरपासून पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल बंद

19 नोव्हेंबरपासून पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल बंद

Follow Us
Follow Us:
  • 19 नोव्हेंबरपासून पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल बंद
  • लकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेड ब्रिजचा असणार पर्याय
  • डेक्कन मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे कामासाठी निर्णय 
Bhide Bridge/Pune: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानक आणि पेठ परिसराला जोडणाऱ्या नवीन पादचारी पुलाच्या बांधकामामुळे मुठा नदीवरील भिडे पूल गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पुणे मेट्रो प्रशासनाने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.

पादचारी पुलाचा नागरिकांना होणार मोठा फायदा

मुठा नदीवरील भिडे पुलाच्या वरून हा महत्त्वाचा पादचारी पूल उभारण्यात येत आहे. या पुलाच्या निर्मितीमुळे नारायण पेठ, शनिवार पेठ आणि लक्ष्मी रस्ता परिसरातील नागरिकांना, तसेच या भागात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकात ये-जा करणे अत्यंत सोयीचे आणि सुलभ होणार आहे. तथापि, पुलाचे बांधकाम वेगाने आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षित वातावरणात पूर्ण करता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मोठी बातमी! पुण्यातील ‘हा’ सुप्रसिद्ध पूल दीड महिना राहणार बंद; काय आहे कारण?

नदीपात्रातील रस्ता खुला, प्रशासनाचे पर्यायी मार्गांचे आवाहन

भिडे पूल वाहतुकीसाठी बंद असला, तरी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. तसेच वाहनचालकांसाठी प्रशासनाने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

भिडे पूल बंद आणि पर्यायी मार्ग

  • बंद कालावधी: १९ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६
  • बंद होण्याची वेळ: १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६:०० वाजल्यापासून
  • उद्देश: डेक्कन मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या नवीन पादचारी पुलाचे बांधकाम
  • नदीपात्रातील रस्ता: वाहतुकीसाठी खुला राहील
  • वाहतुकीसाठी पर्यायी पूल:

    १. लकडी पूल

    २. बालगंधर्व पूल

    ३. झेड ब्रिज

पुण्यातील खडकवासला धरण ‘फुल्ल’; भिडे पूल गेला पाण्याखाली, जाणून घ्या इतर धरणांची स्थिती…

पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. या कालावधीत नागरिकांना होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल पुणे मेट्रो प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पुण्यातील नदीपात्रातील सुप्रसिद्ध भिडे पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी कधीपासून बंद राहणार आहे?

    Ans: भिडे पूल गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

  • Que: भिडे पुलावर नवीन पादचारी पूल बांधण्याचा नागरिकांना काय फायदा होणार आहे?

    Ans: नवीन पादचारी पुलामुळे नारायण पेठ, शनिवार पेठ आणि लक्ष्मी रस्ता परिसरातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकात थेट आणि सोयीस्करपणे ये-जा करता येणार आहे.

Web Title: Pune famous bhide bridge closed 19 november to 31 december metro work latest news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 09:06 PM

Topics:  

  • Bridge
  • Pune Metro
  • pune news
  • Pune Traffic

संबंधित बातम्या

Pune News : पुण्यात रिंगरोडच्या मोजणीला विरोध; ‘या’ मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले नागरिक
1

Pune News : पुण्यात रिंगरोडच्या मोजणीला विरोध; ‘या’ मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले नागरिक

६ वर्षांची शानदार सेवा, १२ दीक्षांत संचलनांचा साक्षीदार! NDA चा लाडका ‘रिलायंट रॉबिन’ घेणार निरोप
2

६ वर्षांची शानदार सेवा, १२ दीक्षांत संचलनांचा साक्षीदार! NDA चा लाडका ‘रिलायंट रॉबिन’ घेणार निरोप

Baramati Court: सुधारित वेतनश्रेणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; बारामतीसह जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज ठप्प!
3

Baramati Court: सुधारित वेतनश्रेणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; बारामतीसह जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज ठप्प!

ST Tirthatan Yojna: एसटीच्या ‘संगे तीर्थाटन’ योजनेतून देवदर्शनासह पर्यटनाची संधी; नोव्हेंबरमध्ये विशेष सहलींचे नियोजन
4

ST Tirthatan Yojna: एसटीच्या ‘संगे तीर्थाटन’ योजनेतून देवदर्शनासह पर्यटनाची संधी; नोव्हेंबरमध्ये विशेष सहलींचे नियोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.