Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Court: सुधारित वेतनश्रेणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; बारामतीसह जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज ठप्प!

Baramati Court महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयांमधील कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, अशी न्यायालयीन कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 17, 2026 | 05:59 PM
Baramati Court Employees Strike, Pune District Court Staff Strike,

Baramati Court Employees Strike, Pune District Court Staff Strike,

Follow Us
Follow Us:
  • बारामतीसह पुणे जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू.
  • मुंबई उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी देण्याची प्रमुख मागणी.
  • वेतन श्रेणीचा प्रस्ताव गेल्या २१ महिन्यांपासून मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्रलंबित असल्याचा दावा
Baramati News: सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी मंगळवार (दि. १७) पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा मोठा फटका बारामतीसह पुणे जिल्ह्यातील विविध न्यायालयांच्या कामकाजाला बसला असून, अनेक ठिकाणी न्यायालयीन कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे न्यायालयात सुनावणीसाठी आलेले पक्षकार, वकील आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयांमधील कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, अशी न्यायालयीन कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. यासंदर्भातील अधिकृत प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव गेल्या २१ महिन्यांपासून मुख्यमंत्री कार्यालयाकडे निर्णयाविना प्रलंबित असल्याचा दावा कर्मचारी संघटनांनी केला आहे.

याबाबत पुणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांना या काम बंद आंदोलनाबाबत निवेदन सादर केले होते, यामध्ये पुणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना गट क, महाराष्ट्र राज्य लघुलेखक संघटना, पुणे जिल्हा बेलीफ संघ, पुणे जिल्हा न्यायालयीन चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्व न्यायालयीन कर्मचारी या बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले.

या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून काळ्या फिती लावून काम केले होते. तसेच वरिष्ठ पातळीवर निवेदने देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मागणी मान्य न झाल्यास बेमुदत संप पुकारण्याचा इशाराही संघटनांनी दिला होता. मात्र, शासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने अखेर मंगळवारपासून आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले.

Sanjay Raut Contempt Case: तुम्ही अनुभवी राजकारणी..; संजय राऊतांना सर्वोच्च न्यायालयाचे खडे बोल

या आंदोलनात पुणे जिल्हा व सर्व अधीनस्थ न्यायालयांमधील प्रबंधक, अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक, नाझीर, लघुलेखक, लिपिक, बेलिफ, वाहनचालक, कोर्ट कीपर, झेरॉक्स ऑपरेटर, पुस्तक बांधणीकार, शिपाई, सफाईगार यांच्यासह सर्व संवर्गांतील कर्मचारी सहभागी झाले आहेत.

बारामती जिल्हा व सत्र न्यायालयातील कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतल्याने न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला. न्यायालयीन कामासाठी आलेल्या नागरिकांना कामे न होताच परतावे लागले. आधीच विविध न्यायालयीन प्रकरणांच्या तारखांसाठी नागरिकांना वारंवार न्यायालयात यावे लागते. त्यातच बेमुदत संपामुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

दरम्यान, सुधारित वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार न्यायालयीन कर्मचारी संघटनांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शासन या मागणीबाबत काय भूमिका घेणार आणि न्यायालयीन कामकाज पूर्ववत कधी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांसाठी DCM सुनेत्रा पवार आल्या धावून; राष्ट्रवादीच्या पक्षातील आमदारांनी घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

“न्यायव्यवस्थेचा कणा मजबूत ठेवायचा असेल, तर या कण्याला बळ देणाऱ्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे अत्यावश्यक आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे. हा आमच्या आत्मसन्मानाचा आणि अस्तित्वाचा लढा असून शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढवून ‘बेमुदत संप’ पुकारणे हाच आमचा शेवटचा पर्याय निवडावा लागला आहे.”

– विशाल दत्तात्रय सोनवणे (कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना गट क, पुणे).

 

Web Title: Baramati pune court employees indefinite strike over revised pay scale demand as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • baramati news
  • pune news

संबंधित बातम्या

ST Tirthatan Yojna: एसटीच्या ‘संगे तीर्थाटन’ योजनेतून देवदर्शनासह पर्यटनाची संधी; नोव्हेंबरमध्ये विशेष सहलींचे नियोजन
1

ST Tirthatan Yojna: एसटीच्या ‘संगे तीर्थाटन’ योजनेतून देवदर्शनासह पर्यटनाची संधी; नोव्हेंबरमध्ये विशेष सहलींचे नियोजन

एफसी रोडवरील अतिक्रमणावरून भाजप नगरसेवक आक्रमक; महापालिका सभागृहातच आंदोलन
2

एफसी रोडवरील अतिक्रमणावरून भाजप नगरसेवक आक्रमक; महापालिका सभागृहातच आंदोलन

पुणे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरु; प्रशासनाच्या निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष
3

पुणे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरु; प्रशासनाच्या निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष

Pune MSEB: वीजबिल भरायला पुणेकरांची टाळाटाळ? तब्बल ‘इतक्या’ कोटींची थकबाकी
4

Pune MSEB: वीजबिल भरायला पुणेकरांची टाळाटाळ? तब्बल ‘इतक्या’ कोटींची थकबाकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.