Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

६ वर्षांची शानदार सेवा, १२ दीक्षांत संचलनांचा साक्षीदार! NDA चा लाडका ‘रिलायंट रॉबिन’ घेणार निरोप

Indian Armed Forces: एनडीएमध्ये केवळ लष्करी अधिकारी घडविण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही, तर सैन्यदलांच्या समृद्ध परंपरा आणि शिस्तीचा वारसाही जपला जातो. याच परंपरेतील महत्त्वाचा भाग म्हणजे अज्युटंटचा अश्व.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 17, 2026 | 06:36 PM
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत होणार संचलन 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत होणार संचलन 

Follow Us
Follow Us:
  • १२ दीक्षांत संचलनांचा मानकरी ‘रिलायंट रॉबिन’ घेणार निरोप
  • २९ नोव्हेंबरला अखेरचे संचलन अन् होणार औपचारिक सांगता 
  • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत होणार संचलन 
सुनयना सोनवणे/Indian Armed Forces: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) खेत्रपाल परेड मैदानावर लष्करी शिस्त, परंपरा आणि दिमाखाची ओळख बनलेला ‘रिलायंट रॉबिन’ आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. प्रबोधिनीच्या अज्युटंटचा अश्व (चार्जर) म्हणून गेली सहा वर्षे जबाबदारी सांभाळणाऱ्या या अश्वाने आतापर्यंत १२ दीक्षांत संचलनांमध्ये (पासिंग आऊट परेड) सहभाग घेतला आहे. येत्या २९ नोव्हेंबरला होणाऱ्या १३व्या दीक्षांत संचलनात तो अखेरचा सहभागी होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या संचलनानंतर त्याच्या औपचारिक सेवेची सांगता होईल.

एनडीएमध्ये केवळ लष्करी अधिकारी घडविण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही, तर सैन्यदलांच्या समृद्ध परंपरा आणि शिस्तीचा वारसाही जपला जातो. याच परंपरेतील महत्त्वाचा भाग म्हणजे अज्युटंटचा अश्व. दीक्षांत संचलनावेळी प्रबोधिनीचा अज्युटंट अश्वावर स्वार होऊन संचलन मैदानावर प्रवेश करतो. रुबाबदार उपस्थिती आणि शिस्तबद्ध हालचालींमुळे हा अश्व संचलनाचे विशेष आकर्षण ठरतो. त्यामुळे अज्युटंटचा अश्व हा केवळ संचलनाचा भाग नसून, लष्करी शिस्त, नेतृत्व आणि गौरवशाली वारशाचे प्रतीक मानला जातो. गेल्या सहा वर्षांपासून रिलायंट रॉबिनने ही परंपरा दिमाखात पुढे नेली आहे.

Indian Armed Forces: युद्धात कोण ठरणार वरचढ, माणूस की AI? पुण्यातील ‘मिलिट’मध्ये रंगले महत्त्वाचे चर्चासत्र

बारा संचलनांचा साक्षीदार

जून २०२० मध्ये अज्युटंटचा अश्व म्हणून सेवेत दाखल झालेल्या रिलायंट रॉबिनने आतापर्यंत १२ दीक्षांत संचलनांमध्ये सहभाग घेतला आहे. या काळात एनडीएमधील अनेक तुकड्यांनी खडतर प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात अधिकारी म्हणून प्रवेश केला. या प्रत्येक तुकडीच्या प्रशिक्षण प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्याचा रिलायंट रॉबिन साक्षीदार ठरला आहे. हजारो छात्र, वरिष्ठ लष्करी अधिकारी, मान्यवर आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या संचलनांमध्ये त्याने अज्युटंटला समर्थ साथ दिली. एनडीएच्या प्रतिष्ठित लष्करी सोहळ्यांमधील त्याचे योगदानही उल्लेखनीय ठरले आहे.

अज्युटंटच्या अश्वाची निवडही विशेष

एनडीए, भारतीय सैन्य अकादमी (आयएमए) आणि अधिकारी प्रशिक्षण अकादमी (ओटीए) यांसारख्या लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्ये अज्युटंट या पदाला विशेष महत्त्व आहे. संपूर्ण अकादमीतील शिस्त राखण्याची, कॅडेट्सपासून अश्वदलापर्यंतच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी अज्युटंटवर असते. दीक्षांत संचलनात अज्युटंट अश्वावर स्वार होऊन संपूर्ण संचलनाचे नेतृत्व करतो. त्यामुळे या पदावर नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्याला उत्तम घोडेस्वारीचे कौशल्य असणे आवश्यक असते. निवड प्रक्रियेत अधिकाऱ्याच्या अन्य पात्रतांसोबतच त्याच्या घोडेस्वारीच्या कौशल्याचीही पडताळणी केली जाते.

अज्युटंटसाठी निवडला जाणारा अश्वही विशेष प्रशिक्षणातून तयार केला जातो. लष्करी बँडचे आवाज, हजारो प्रेक्षकांच्या टाळ्या, विमानांचे उड्डाण आणि संचलनादरम्यानच्या विविध हालचाली अशा वातावरणातही घोड्याने शांत आणि शिस्तबद्ध राहणे अपेक्षित असते. त्यासाठी अनेक महिने विशेष प्रशिक्षण दिले जाते. संचलनाच्या अखेरीस निरीक्षणासाठी आलेल्या प्रमुख अधिकाऱ्याला मानवंदना देण्याची जबाबदारीही अज्युटंट आणि त्याच्या अश्वाची असते. त्यामुळे या अश्वाची निवड आणि प्रशिक्षण या दोन्ही प्रक्रियांना विशेष महत्त्व आहे. साधारणपणे एक अश्व सहा ते सात वर्षे ही जबाबदारी सांभाळतो.

पाकिस्तानची फाटणार! शत्रूला मारण्यासाठी भारताचे ‘Pralay’ सज्ज; ओडिशाच्या किनारपट्टीवर…

एनडीएतील अश्वदलाचे महत्त्व

– एनडीएमध्ये छात्रांचे प्रशिक्षण, विविध सोहळे आणि अश्वारोहण खेळांसाठी १६० पेक्षा अधिक अश्वांचा स्वतंत्र तबेला आहे.
– ‘इक्विटेशन ट्रेनिंग टीम’ (ईटीटी) द्वारे दुसऱ्या आणि चौथ्या सत्रातील छात्रांना घोडेस्वारीचे (वॉक, कॅंटर आणि गॅलप) मूलभूत प्रशिक्षण सक्तीने दिले जाते.
– पोलो, शो जंपिंग, इव्हेंटिंग आणि टेंट पेगिंग अशा अश्वक्रीडा प्रकारांचाही सराव केला जातो.
– स्नायूंची क्षमता, शारीरिक संतुलन, मानसिक एकाग्रता, धैर्य आणि प्रसंगानुरूप निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे हा प्रशिक्षणाचा उद्देश आहे.
– प्रबोधिनीच्या प्रमुख सोहळ्यांसाठी १९५३ मधील दोन घोड्यांची ऐतिहासिक बग्गी आजही वापरली जाते.

परंपरेचे शिलेदार…

परेड मैदानावर डौलाने आणि शिस्तीने संचलन करत एनडीएच्या परंपरेत मोलाची भर घालणाऱ्या चार्जर्सचा कार्यकाळ –
अश्वाचे नाव – सेवेचा कालावधी

लाईमलाईट – जानेवारी १९५५ ते ऑगस्ट १९७६
पृथ्वीराज – एप्रिल १९६८ ते ऑक्टोबर १९९६
रोमिओ – सप्टेंबर १९७८ ते ऑगस्ट २००१
वॉरियर – ऑगस्ट २००१ ते जून २०१९
नक्ष – जुलै २००५ ते फेब्रुवारी २०१२
ग्लोबट्रोटर – मार्च २०१२ ते जानेवारी २०२०
रिलायंट रॉबिन – जून २०२० ते नोव्हेंबर २०२६

💡

Frequently Asked Questions

  • Que: रिलायंट रॉबिन कोण आहे?

    Ans: रिलायंट रॉबिन हा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) अज्युटंटचा अश्व आहे.

  • Que: रिलायंट रॉबिन अखेरच्या दीक्षांत संचलनातील कधी सहभागी होणार आहे?

    Ans: येत्या २९ नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या एनडीएच्या १३व्या दीक्षांत संचलनात रिलायंट रॉबिन अखेरचा सहभागी होणार आहे.

Web Title: Indian armed forces nda reliant robin horse retired after 6 years of india tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • Defense Sector
  • Indian Armed Forces
  • pune news
  • Rajnath Singh

संबंधित बातम्या

Baramati Court: सुधारित वेतनश्रेणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; बारामतीसह जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज ठप्प!
1

Baramati Court: सुधारित वेतनश्रेणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; बारामतीसह जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज ठप्प!

ST Tirthatan Yojna: एसटीच्या ‘संगे तीर्थाटन’ योजनेतून देवदर्शनासह पर्यटनाची संधी; नोव्हेंबरमध्ये विशेष सहलींचे नियोजन
2

ST Tirthatan Yojna: एसटीच्या ‘संगे तीर्थाटन’ योजनेतून देवदर्शनासह पर्यटनाची संधी; नोव्हेंबरमध्ये विशेष सहलींचे नियोजन

एफसी रोडवरील अतिक्रमणावरून भाजप नगरसेवक आक्रमक; महापालिका सभागृहातच आंदोलन
3

एफसी रोडवरील अतिक्रमणावरून भाजप नगरसेवक आक्रमक; महापालिका सभागृहातच आंदोलन

पुणे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरु; प्रशासनाच्या निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष
4

पुणे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरु; प्रशासनाच्या निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.