Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्या’ तरुणाच्या खुनाचा दोन तासात लावला छडा; काळेपडळ पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

हांडेवाडीतील तरुणाच्या खून प्रकरणाचा छडा पोलिसांनी दोन तासात लावला आहे. खून करुन पसार झालेल्या एकाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 21, 2026 | 06:20 PM
'त्या' तरुणाच्या खुनाचा दोन तासात लावला छडा; काळेपडळ पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

'त्या' तरुणाच्या खुनाचा दोन तासात लावला छडा; काळेपडळ पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, हाणामाऱ्या, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता हांडेवाडीतील तरुणाच्या खून प्रकरणाचा छडा पोलिसांनी दोन तासात लावला आहे. खून करुन पसार झालेल्या एकाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे.

 

आकाश मारुती झांबरे (वय ३१, रा. झांबरे तालीम चौक, होळकरवाडी, ता. हवेली) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आकाश उर्फ आत्या अशोक भरेकर (वय ३१, रा. झांबरे तालीम चौक, होळकरवाडी, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत झांबरे याचा चुलतभाऊ रवींद्र जालिंदर झांबरे यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कात्रज-हडपसर बाह्यवळण मार्गावरील हांडेवाडी भागात एका सोसयाटीजवळ असलेल्या मोकळ्या जागेत तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती शनिवारी (२० जून) सकाळी पोलिसांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गौहर हसन, परिमंडळ सहाचे पोलिस उपायुक्त जीवन बेनीवाल, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे, राजेंद्र मुळीक, वरिष्ठ निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

हे सुद्धा वाचा : व्यावासयिक विशाल अगरवालच्या अडचणीत वाढ? जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव

गु्न्हे शाखा आणि काळेपडळ पोलिस ठाण्यातील पथकांनी तपास सुरु केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संशयावरुन भरेकर याला ताब्यात घेतले. चौकशीत भरेकर याने झांबरे याचा खून केल्याची कबुली दिली. नंतर त्याला अटक केली. खुनामागचे निश्चित कारण समजू शकले नाही. भरेकर याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विलास सुतार तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : ओमराजे निंबाळकर धाराशिवला पोहोचण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंचा माजी मंत्र्याला आदेश, नेमकं काय घडतंय?

माढ्यात जुन्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला

सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्ख्या भावाने आणि पुतण्याने मिळून आपल्याच भावावर कोयत्याने आणि लोखंडी रॉडने भीषण प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे. डोक्यावर तब्बल ७ ते ८ वार करण्यात आले आहे. यात महादेव जाधव हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा हल्ला जुन्या कौटुंबिक वादातून झाला आहे. या थरारक घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: The kalepadal police have arrested the accused who murdered the young man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Buldhana News: मजुरीच्या पैशावरून चाकूने प्राणघातक हल्ला; पिंपळगाव काळे येथे पेटला होता वाद
1

Buldhana News: मजुरीच्या पैशावरून चाकूने प्राणघातक हल्ला; पिंपळगाव काळे येथे पेटला होता वाद

सराईत वाहनचोराला ठोकल्या बेड्या, 6 दुचाकी जप्त; विश्रांतवाडी पोलिसांची मोठी कारवाई
2

सराईत वाहनचोराला ठोकल्या बेड्या, 6 दुचाकी जप्त; विश्रांतवाडी पोलिसांची मोठी कारवाई

Jalgaon Shalarth ID Scam: आरोपींवर कठोर कारवाई करा, शालार्थ आयडी घोटाळा; आमदार एकनाथराव खडसे यांची मागणी
3

Jalgaon Shalarth ID Scam: आरोपींवर कठोर कारवाई करा, शालार्थ आयडी घोटाळा; आमदार एकनाथराव खडसे यांची मागणी

धक्कादायक ! अश्लील फोटोसाठी सातवीतील मुलीवर दबाव; ऑनलाईन ओळख झाली अन् नंतर त्याच…
4

धक्कादायक ! अश्लील फोटोसाठी सातवीतील मुलीवर दबाव; ऑनलाईन ओळख झाली अन् नंतर त्याच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.