NAXLITE (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)
ज्या माओवाद्याला 2011 पासूनएका गंभीर गुन्ह्यात एटीएस शोधत होते, तो प्रशांत उर्फ लॅपटॉप कांबळे पुणे आणि रायगड दरम्यान एका गावात आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षक म्हणून काम करत होता. सुमारे २०१७ ते २०२५ पर्यंत हा माओवादी शिक्षक म्हणून काम करत होता. शहरी माओवाद कश्या छुप्या पद्धतीने तुमच्या अवतीभवती कार्यरत असतो याचा एक हा उदाहरण महाराष्ट्रातून समोर आला आहे. प्रशांत उर्फ लॅपटॉप कांबळे हा २०१७ च्या पूर्वी तो २०११ ते २०१७ च्या दरम्यान गडचिरोलीतील घनदाट जंगलात माओवाद्यांच्या दलममध्ये कार्यरत होता. २०१७ नंतर स्वतःला एटीएस आणि पोलिसांच्या नजरेतून लपवून ठेवण्यासाठी त्याने “सुनील जगताप” असे बनावट नाव धारण केले होते.
एवढेच नव्हे तर त्याने स्वतःचे सर्व बनावट डॉक्युमेंट्स ही तयार करून घेतले होते. या नव्या खोट्या नावाने स्वतःला समाजात स्थापित करण्यासाठी, स्वतःची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी त्याने 2018 मध्ये एका डॉक्युमेंटरीमध्ये काम करून त्या माध्यमातून तो कसा उत्कृष्ट शिक्षक आहे, त्याला आदिवासी विद्यार्थ्यांची किती काळजी आहे, हे सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न देखील केला होता.
धक्कदायक बाब म्हणजे २०११ पासून पासून एटीएस ज्या माओवाद्याला शोधत होते त्याची 2018 मध्ये डॉक्युमेंटरी तयार झाल्यानंतर ही एटीएसला त्या संदर्भात काहीही माहिती मिळाली नव्हती. २०२५ च्या मे महिन्यात प्रशांत उर्फ लॅपटॉप कांबळेला पुण्यात अटक झाल्यानंतर तपासात हे सर्व खुलासे झाले आहे.
देशव्यापी बंदची हाक
माओवाद्यांकडून 10 जूनला देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. देशभर ‘स्मारक सभा’ आयोजित करण्याचे ही माओवाद्यांचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच केंद्र सरकारने माओवाद्यांच्या शांतता आणि युद्धबंदीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करत 21 मे रोजी 27 माओवाद्यांची हत्या केल्याचा आरोप माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने काढलेल्या पत्रकात करण्यात आला आहे. माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसव राजू मारला गेल्यानंतर केंद्र सरकारच्या निषेधासाठी हे बंदचे आवाहन माओवाद्यांकडून करण्यात आलंय.