रस्त्याच्या कडेला दोन मोठ्या काळ्या पिशव्या, उघडून पाहिलं तर...; कर्नाटकातील भयानक प्रकार समोर
राज्यासह देशभरात गुन्हेगारांनी धुमाकूळ घातल्याचे अनेक प्रकरण आपण पाहिले आहेत. खून, मारामाऱ्या, लुटमार, दरोडे यासारख्या गंभीर घटना देशभरात घडत आहेत. गुन्हेगारांमध्ये नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरत आहे. अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रस्त्याच्या कडेला दोन मोठ्या काळ्या पिशव्या ठेवल्या होत्या. त्या पिशव्या पाहून गावकऱ्यांना संशय येऊ लागला. त्यांनी तातडीने पोलिसांना बोलावले. त्यानंतर पिशव्या उघडून पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.
कर्नाटकमधील कोरतगेरे येथील कोलाला गावात एका महिलेची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह तुकड्यांमध्ये सापडला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मृतदेहाचे भाग अनेक प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून रस्त्याच्या कडेला फेकण्यात आले होते. प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले. प्लास्टिकची पिशवी उघडताच पोलिसांनाही धक्का बसला. आता या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी रस्त्याने जाणाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या सात प्लास्टिक पिशव्यांमध्ये महिलेच्या शरीराचे अवयव पाहिले आणि याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर कोरतगेरे पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली आणि ८ ऑगस्ट रोजी आणखी सात पिशव्या जप्त केल्या, ज्यात उर्वरित अवयव आणि महिलेचे डोके सापडले. महिलेची हत्या दुसऱ्या ठिकाणी करण्यात आली आणि नंतर मृतदेह तुकड्यांमध्ये कापून येथे फेकण्यात आला, असा पोलिसांना विश्वास आहे. चौकशी टीममधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेची ओळख डोक्याच्या आधारे जवळपास निश्चित करण्यात आली आहे, परंतु अधिकृत पुष्टी अद्याप बाकी आहे. महिलेची हत्या कोणत्या कारणाने करण्यात आली आणि या भयानक हत्याकांड कोणी केला याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
हे सुद्धा वाचा : कोयते लपवण्यासाठी मुलाला आईचीच साथ; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर
शेती विकली नाही म्हणून केला आईचा खून
लातूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहरे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे मुलाने वयोवृद्ध आईचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जमीन विक्रीच्या वादातून ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सांगवी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुमिंद्रबाई जाधव (वय 70) यांच्या नावे असलेली शेती विकावी, असा आग्रह त्यांचा मुलगा काकासाहेब जाधव (वय 48) मागील काही दिवसांपासून धरत होता.