संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. पुण्यातही गेल्या काही महिन्यापासून कोयतेधारी टोळ्या धुमाकूळ घालत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. पोलिसही गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोंबिंग ऑपरेशनदरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चार कोयते जप्त केले आहे. मात्र, तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्यारे अल्पवयीन आरोपीच्या घरात त्याच्या आईच्या परवानगीने लपवल्याचे समोर आल्यानंतर हडपसर पोलिसांनी या गुन्ह्यात आईलाही सहआरोपी केले आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणात विश्वजित उर्फ यश रामचंद्र मोरे (२०, रा. गोंधळेनगर, हडपसर) याला अटक केली आहे. मोरेसह त्याचा अल्पवयीन साथीदार आणि त्या अल्पवयीनची आई यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे पोलिसांकडून शहरात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले व त्यांचे पथक हद्दीत ऑपरेशन राबवित असताना विश्वजित मोरे आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला संशयावरून पकडले. चौकशीत अल्पवयीनाच्या घरातून ४ लोखंडी कोयते जप्त केले. कोयते त्याच्या आईच्या परवानगीने घरात ठेवले असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून या गुन्ह्यात अल्पवयीन तरुणाच्या आईला सहआरोपी केले आहे. यापूर्वी पोलिसांनी अल्पवयीन तरुणांना वाहने चालविण्यास देणाऱ्या पालकांवर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर आता गुन्हेगारी कृत्यास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा देणाऱ्या पालकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.
हे सुद्धा वाचा : चोरटे करोडपती अन् पुणेकर कंगाल; साडेतीन वर्षात तब्बल 73 कोटींचा ऐवज लंपास
शेती विकली नाही म्हणून केला आईचा खून
लातूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहरे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे मुलाने वयोवृद्ध आईचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जमीन विक्रीच्या वादातून ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सांगवी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुमिंद्रबाई जाधव (वय 70) यांच्या नावे असलेली शेती विकावी, असा आग्रह त्यांचा मुलगा काकासाहेब जाधव (वय 48) मागील काही दिवसांपासून धरत होता.