संग्रहित फोटो
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ९ नोव्हेंबर रोजी रात्री पुणे-नगर रस्त्यावरील विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरून जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना कोणतेही कारण नसताना अडवले. त्यानंतर शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील सॅमसंग कंपनीचा मोबाईल, दोन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि २९ हजार ६०० रुपये रोख असा एकूण ५८ हजार ६०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. या घटनेनंतर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
४० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
गुन्ह्याचा तपास करताना पोलिस अंमलदार गणेश पालवे, नटराज सुतार आणि संदीप जायभाये यांनी घटनास्थळासह परिसरातील सुमारे ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. यावेळी संशयित आरोपी लोहगाव येथील कलवड वस्तीमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून रेहान शेख याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला अटक करून त्याच्याकडून फिर्यादीचा चोरीला गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : ड्युटी संपवून घरी जाताना काळाचा घाला; कंपनीच्या बसखाली सुपरवायझरचा मृत्यू
अन्य दोन आरोपींचा शोध सुरू
या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य आरोपींचा शोध येरवडा पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक किशोर बेरड करीत आहेत.
Ans: रेहान अश्रफ शेख (वय १९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
Ans: तरुणाकडील मोबाईल, दोन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि २९ हजार ६०० रुपये रोख असा एकूण ५८ हजार ६०० रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता.
Ans: येरवडा पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेला २० हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत केला आहे. या गुन्ह्यातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.






