Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहशत पसरविण्यासाठी पिस्तुल बाळगणारे गुन्हेगार जेरबंद; 2 गा‌वठी पिस्तुल अन् काडतुसे जप्त

गुन्हेगारीतील क्रेझ तसेच परिसरात दहशत पसरविण्यासाठी अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगार व त्याच्या मित्राला थरारकरित्या सापळा लावून जेरबंद करण्यात आले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 19, 2024 | 12:14 PM
दहशत पसरविण्यासाठी पिस्तुल बाळगणारे गुन्हेगार जेरबंद; 2 गा‌वठी पिस्तुल अन् काडतुसे जप्त

दहशत पसरविण्यासाठी पिस्तुल बाळगणारे गुन्हेगार जेरबंद; 2 गा‌वठी पिस्तुल अन् काडतुसे जप्त

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : गुन्हेगारीतील क्रेझ तसेच परिसरात दहशत पसरविण्यासाठी अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगार व त्याच्या मित्राला थरारकरित्या सापळा लावून जेरबंद करण्यात आले. काळेपडळ पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्यांनी हे पिस्तूल कोठून आणले, याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. रितेश बाबासाहेब कसबे (वय १८, रा. महंमदवाडी रोड, हडपसर) तसेच राहुल संजय चौधरी (वय २१, रा. हडपसर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार दाऊद सय्यद, अतुल पंधरकर व त्यांच्या पथकाने केली आहे.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पेट्रोलिंग तसेच गस्त घातली जात आहे. तर पाहिजे व फरार आरोपी आणि सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवली जात आहे. दरम्यान, काळेपडळ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक अमित शेटे व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा पथकाला माहिती मिळाली की, एका रुग्णालयाच्या पाठिमागील बाजूस सराईत गुन्हेगार रितेश व त्याचा मित्र राहुल चौधरी हे दोघे काही तरी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असून, त्यांच्याजवळ घातक शस्त्र आहेत. त्यानूसार, पथकाने या परिसरात सापळा लावला. मात्र, चाहूल लागताच दोघेही घाबरले.

हे सुद्धा वाचा : मतदानाच्या दिवशी पुणे शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात

पथकाने त्यांना पकडले आणि त्यांची झडती घेतली. तेव्हा रितेश आणि राहुल याच्या झडतीत एक-एक गावठी पिस्तुल मिळाले. तसेच, ४ काडतुसे मिळाली. त्यांच्याकडे चौकशी केली असता दोघेही पिस्तुल हे दहशत बसविण्यासाठी वापरत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, रितेश कसबे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती काळेपडळ पोलिसांनी दिली.

४० तडीपार गुंडांना पोलिसांनी पकडले

निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष तसेच उमेदवारांकडून गुंडाचा वापर केला जात असल्याचा आरोप होत असतानाच पुण्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून जवळपास ४० तडीपार गुंडांना पुणे पोलिसांनी पकडले आहे. त्यात पुण्यात ऐन निवडणुकीच्या काळात अन् प्रचाराच्या धामधुमीत हे तडीपार गुंड शहरात हजेरी लावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या आरोपींमध्ये तथ्य असल्याचे दिसते. राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. हे सुरू असतानाच राजकीय पक्ष तसेच उमेदवार गुंडांचा वापर करत असल्याचाही आरोप होत आहे. दरम्यान निवडणूकीत शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून सतर्कता बाळगत काम केले जात आहे. त्यामध्ये बेकायदा हत्यारे बाळगणाऱ्या गुंडांसह तडीपार गुंडावर नजर ठेवली जात असून, त्यांना चाप लावण्यात येत आहे.

Web Title: The police have arrested the gangsters who were carrying pistols to spread terror nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 12:07 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Murder Case : कात्रज घाटातील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा उलगडा; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
1

Murder Case : कात्रज घाटातील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा उलगडा; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

माढ्यात विवाहित महिलेची आत्महत्या; सासरच्या छळाला कंटाळून संपवलं जीवन
2

माढ्यात विवाहित महिलेची आत्महत्या; सासरच्या छळाला कंटाळून संपवलं जीवन

नवऱ्याचं बाहेर लफडं, बायकोनं प्रेयसीला पकडलं अन्…; भर रस्त्यात अपहरणाचा थरार
3

नवऱ्याचं बाहेर लफडं, बायकोनं प्रेयसीला पकडलं अन्…; भर रस्त्यात अपहरणाचा थरार

पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या; ‘त्या’ दोन आरोपींना पोलिसांनी 24 तासांत केली अटक
4

पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या; ‘त्या’ दोन आरोपींना पोलिसांनी 24 तासांत केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.