1. पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला
2. अमित मालविय यांनी व्हिडिओ केले पोस्ट
3. भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात आहेत – भाजप
Attack On BJP leaders: पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापुर आला आहे. दरम्यान या महापूरच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी भाजपचे एक शिष्टमंडळ पोहोचले होते. तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.
TMC’s Jungle Raj in Bengal! BJP MP Khagen Murmu, a respected tribal leader and two-time MP from North Malda, was attacked by TMC goons while on his way to Nagrakata in Jalpaiguri’s Dooars region to help with relief and rescue efforts after devastating rains, floods, and… pic.twitter.com/pqpd9Vyrk9 — Amit Malviya (@amitmalviya) October 6, 2025
भाजप खासदार खगेन मुरमू आणि अन्य भाजप नेते जलपाईगुडी येथे पाहणीसाठी गेले होते. या ठिकाणी जमलेल्या गर्दीने या भाजप नेत्यांवर दगडफेक केली. यामध्ये भाजप खासदार मुरमू आणि अन्य नेते जखमी झाले. दरम्यान भाजपने पश्चिम बंगालमध्ये भाजपने टीएमसीवर गंभीर आरोप केले आहेत. बचाव कार्य करणाऱ्या भाजप नेत्यांवर हल्ले होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
गर्दीने केलेल्या हल्ल्यात भाजप खासदार खगेन मुरमू आणि अन्य भाजप नेते गंभीर जखमी झाले आहेत. भाजपचे नेते अमित मालविय यांनी या हल्ल्याचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. या हल्ल्यासाठी भाजपने टीएमसीवर म्हणजेच ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर टीका केली आहे.
वसईमध्ये चाललंय तरी काय?
दिवसेंदिवस वसई विरार शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक भयभीत होऊन जीव मुठीत घेत जगत आहेत. शहरातील गुन्हेगारांना ना कायद्याचा धाक राहिला ना पोलीसांचा. अशातच आता अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना विरार शहरात घडली आहे.
झोपेत असलेल्या गोवारी कुटुंबावर अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी पहाटे अर्नाळा गावात घडली असून,या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरले आहे.अर्नाळा गावातील बंदरपाडा येथे राहणारी नेत्रा गोवारी ही तरुणी तिचे वृध्द वडील जगन्नाथ आणि आई लीला हे तिघे गाढ निद्रेत असताना,सोमवारी पहाटे 3च्या सुमारास घरात शिरुन एका अज्ञाताने,त्यांच्यावर चाॅपरने हल्ला केला. सर्वप्रथम त्याने नेत्रावर हल्ला केला,त्यावेळी तिच्या बचावासाठी वडील पुढे सरसावले असता,त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवरही चाॅपरने सपासप वार करण्यात आले.
Crime News : वसईमध्ये चाललंय तरी काय ? भर झोपेत कुटुंबावर चॉपरने हल्ला; अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना
या हल्ल्यात गोवारी कुटुंब गंभीर जखमी झाले आहेत.जगन्नाथ गोवारी यांच्या हाताची बोटे,डोके आणि अन्य ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत.तर लीला आणि नेत्रा ही गंभीर जखमी झाल्या आहेत.त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहेत.या घटनेने पुन्हा एकदा अनधिकृत भाडेकरुंचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.थोड्याशा भाड्यापोटी कुठलीही कागदपत्र न घेता भाडेकरुंना आसरा देणाऱ्यांची आणि अनधिकृत भाडेकरुंची चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.