
Rabia Ahsan News Anchor Rabia Ahsan Shot Dead Rawalpindi
पाकिस्तानातून (Pakistan News) एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. रावळपिंडी शहरातील गुलशनबाद परिसरात राहणाऱ्या प्रसिद्ध महिला टीव्ही अँकर आणि न्यूज प्रेझेंटर राबिया अहसान (वय ४१ वर्षे) यांची राहत्या घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. राबिया या पाकिस्तानमधील आघाडीच्या ‘९२ न्यूज’ (92 News) या वाहिनीवर अँकर म्हणून कार्यरत होत्या. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तानमधील पत्रकार जगतात आणि प्रसारमाध्यमांमध्ये भीतीचे व शोककळा पसरले आहे.
रावळपिंडी शहरातील गुलशनबाद (अडियाला रोड) सेक्टर दोन येथील राहत्या घरात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच रावळपिंडीचे शहर पोलीस अधिकारी (CPO) हसन मुश्ताक सुखेरा, एसएसपी ऑपरेशन्स आणि एसएसपी इन्व्हेस्टिगेशन्स यांच्यासह मोठा पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राबिया यांचा मृतदेह बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. पंजाब फॉरेन्सिक सायन्स एजन्सीच्या (PFSA) पथकाने तातडीने घटनास्थळावरून वैज्ञानिक पुरावे आणि नमुने गोळा केले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा मुख्यालयाच्या रुग्णालयात (DHQ Hospital) पाठवण्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan : पाकिस्तानात दिवाळीच्या दिवशी हिंदूंचे कौतुक; पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जिनांचा उल्लेख करत केला मोठा दावा
या प्रकरणी पोलिसांनी राबिया अहसान यांच्या पतीला (अहसान ताहीर) ताब्यात घेतले असून, गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेले पिस्तूलही जप्त केले आहे. एका घरगुती कामगाराच्या आणि प्राथमिक तपासाच्या आधारे पतीने दावा केला आहे की, पिस्तूल हाताळताना किंवा खेळताना अचानक अपघाताने गोळी सुटली आणि ती राबिया यांना लागली.
मात्र, पोलिसांनी या अपघाताच्या दाव्यावर लगेच विश्वास न ठेवता सखोल चौकशी सुरू केली आहे. सदर बैरुनी पोलीस ठाण्यात (Sadar Bairuni Police Station) हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच गोळीबार नक्की कसा झाला याचे रहस्य उलगडणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Poland : पोलंडमध्ये माथेफिरूचा थरार! 6 जणांची हत्या करून घरात आई-वडिलांनाही उडवले; 2 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर
पाकिस्तानच्या प्रथम महिला आसिफा भुट्टो-झरदारी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून हत्येचा जोरदार निषेध केला आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, आसिफा यांनी या प्रकरणी निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यावेळी आसिफा यांनी रावळपिंडीतील महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी ऑगस्ट महिन्यात रावळपिंडीत घडलेल्या ४५ वर्षीय डिजिटल मीडिया एक्झिक्युटिव्ह हिना जावेद यांच्या हत्येचीही आठवण करून दिली. हिना जावेद यांचा मृतदेह घरात संशयास्पद स्थितीत आढळला होता आणि त्यांच्या शरीरावर छळाच्या खुणा होत्या. रावळपिंडीत एकामागोमाग एक कार्यरत महिलांना लक्ष्य केले जात असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Ans: मृत महिला टीव्ही अँकरचे नाव राबिया अहसान (वय ४१ वर्षे) असून त्या '९२ न्यूज' या चॅनलवर अँकर होत्या.
Ans: ही घटना पाकिस्तानातील रावळपिंडी येथील गुलशनबाद भागात घडली असून, पोलिसांनी अँकरच्या पतीला ताब्यात घेतले आहे.
Ans: पतीने असा दावा केला आहे की, शस्त्रातून अपघाताने गोळी सुटून (Accidental Firing) राबिया यांना लागली.