Beed News : बीडच्या विलास घुले हत्या प्रकरणावरुन बजरंग सोनवणेंनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करत ऑडिओ क्लिप ऐकवली. दुसरीकडे धनंजय मुंडेंनी फडणवीसांची भेट घेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी केली.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने बीडकरांचं पुणे रेल्वे कनेक्शन अखेर सुरू झालं. सुनेत्रा पवारांच्या हस्ते बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या प्रयत्नांचा उल्लेख करत बीडच्या विकासासाठी पुढेही काम करण्याचं आश्वासन दिलं.
बीडमध्ये पावसाअभावी पिकं वाळल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. ‘जरांगेंकडे जायला वेळ, शेतकऱ्याच्या बांधावर यायला नाही’ म्हणत कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
Maratha reservation: जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस उजाडला असताना बीडमध्येही मराठा बांधवांनी आंदोलन करत सरकारविरोधात संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्याने प्रशासन आणि पोलिस यंत्रणाही अलर्ट मोडवर आली आहे.
Beed News: बीड कृषी उत्पन्न बाजार समितीतील रेशीम कोष खरेदी केंद्रात रेशीम कोषाला प्रतिक्विंटल ९३ हजार रुपये म्हणजेच ९३० रुपये प्रतिकिलोचा विक्रमी भाव मिळाला. शनिवारी झालेल्या लिलावात सुरुवातीची बोली ९१० रुपये प्रतिकिलो होती. व्यापाऱ्यांमधील स्पर्धेमुळे ती वाढत जाऊन अखेर ९३० रुपयांवर पोहोचली.
बीड एसटी विभागात बाहेरून बदली होऊन आलेल्या कर्मचाऱ्यांवर ज्येष्ठतेच्या नावाखाली अन्याय होत असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला. परिपत्रकाची योग्य अंमलबजावणी करून सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय द्यावा, अन्यथा आत्मसन्मानासाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्...
बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव समोर आल्यानंतर वाद अधिकच चिघळला आहे. केजमध्ये कुटुंबीय आणि नागरिकांनी मोर्चा काढत अटकेची व मकोका लावण्याची मागणी केली असून एसआयटीकडून चौकशी सुरू आहे.
Beed News: ३१० कोटी रुपयांच्या या बोगस निवाड्यापैकी ७३ कोटी रुपयांचे वाटप आधीच झाले आहे. उर्वरित रक्कम शासनाने वेळीच रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला. वाटप झालेले ७३ कोटी रुपये ज्यांनी उचलले आहेत.
विलास घुले हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील राजकारण तापले असून, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, बजरंग सोनवणे आणि इतर काही नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात साक्षीदार असलेल्या दादा खिंडकर आणि समाधान या भावांमध्येच आता टोकाचे मतभेद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण आले आहे.
आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील बडे नेते आणि आमदार अशी ओळख असलेले विजयसिंह पंडित आणि संदीप क्षीरसागर यांच्यात वाद उफाळून आला आहे.
साखर कारखाने ऑफिस रेकॉर्डवर शेतकऱ्यांचे पैसे दिल्याचे दर्शवत आहेत, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप उसाचा एक रुपयाही जमा झालेला नाही.