crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
मुंबईतल्या कांदिवली पश्चिम भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. मंदिराच्यापुजाऱ्यानेच मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. एवढेच नाही तर तरुणीच्या घरच्यांनी तक्रार दाखल केली तेव्हा आरोपी पुजाऱ्याने देवासमोरच दोर लावत फास घेतला आणि आत्महत्या केली. ही घटना आहे कांदिवली पश्चिम भागातील लालजीपाडा परिसरात तारकेश्वर महादेव मंदिर आहे.
या मंदिरात पुजारी पाच वर्षापासून देवाची पूजा करत होता. त्याने नित्याने दर्शनासाठी येणाऱ्या तरुणीला आक्षेपार्ह मेसेज पाठवले आणि पूजा करण्यासाठी घरी बोलावल आणि दार बंद करून शरीर सुखाची मागणी केली. तरुणीने घाबरल्या अवस्थेत पालकांना ही सगळी गोष्ट सांगितली पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदनामीच्या भीतीने स्वतःच जीवन संपवल
राजेश स्वामी अस या आत्महत्या करणाऱ्या पुजाऱ्याचे नाव आहे. तो मुळचा मध्य प्रदेश ग्वालियरचा राहणार होता. गेल्या पाच वर्षापासून तो तारकेश्वर मंदिरात पूजा करत होता. त्याची नजर त्या मुलीवर गेली आणि त्याने घृणास्पद कृत्य केल. गुन्हा दाखल झाल्याची त्याला कुणकुण लागली आणि अटक होण्याच्या भीतीने आणि बदनामी होईल याची त्याला भीती वाटली. देवेसमोरच त्याने फास घेतला आणि स्वतःच जीवन संपवल.
या प्रकरणी पोलिसांनी एडीआर दाखल करून मृतदेह शवविच्छेदन रुग्णालयात पाठवून दिला. मंदिरात येणाऱ्या आणखी काही मुलींचा त्याने विनयभंग केला आहे का? याचा तपास आता केला जात आहे. मात्र पुजाऱ्यानेच केलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे.
नालासोपाऱ्यात नायजेरियन युवकाची किरकोळ वादातून हत्या
नालासोपाऱ्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे.नालासोपारा शहरात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिक राहत आहेत. नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर येथे त्यांची सर्वाधिक संख्या आहे. क्षुल्लक वादातून एका नायजेरियन नागरिकाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास नालासोपारा पूर्वेचा प्रगतीनगरमध्ये ही घटना घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव लकी इकेचकव उईजे (32)असे आहे. शनिवारी मध्यरात्री प्रगतीनगरच्या रोशन अपार्टमेंट येथील मोनू किराणा दुकाना जवळ तीन नायजेरियन बातचीत करत उभे होते. त्यावेळी त्यांच्या परिचयाचा लकी इकेचकव उईजे (32) हा तिथे आला. काही वेळात त्यांच्यात क्षुल्लक बाबीवरून मोठा वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसान मारामारीत झाले. यावेळी दोघांनी लकी याच्या डोक्यात काचेची बाटली फोडून त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी तुळींज पोलिसांनी तीन नायजेरियन नागरिकांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 103 (2), 3 (5) प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी २ आरोपी नायजेरियन नागरिकांना अटक केली असून तर एक आरोपी फरार झाला आहे.पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अयूला बाबाजिदे बार्थलोम (50), ओघेने इगेरे (47) यांना अटक करण्यात आली असून ओडिया इझू पेक्यूलिअर (50) हा फरार आहे.