बीड: बीडच्या परळीमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पोरानेच आपल्या जन्मदात्या आईची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. राहते घर नावावर करायला नकार दिल्याने मुलानेच आपल्या आईच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सुनंदा ज्ञानोबा कांगणे असे मृत आईचे नाव असून आरोपीचे नाव चंद्रकांत कांगणे याला परळी ग्रामीण पोलिसांनी अटक केले आहे. ही घटना परळी तालुक्यातील भोजनाकवाडी गावात घडली आहे.
नेमकं काय घडलं?
अधिकची माहिती अशी की,सुनंदा कांगणे यांच्या नावावर गावात राहते घर होते. त्यांचा मुलगा चंद्रकांत कांगणे यांने हे घर आपल्या नावावर करून देण्याचा वारंवारण दबाव आणत होता. मात्र, सुनंदा यांनी घर मुलाच्या नावावर करण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या चंद्रकांतने आईशी वारंवार वाद घालण्यास सुरुवात केली होती. गेल्या काही दिवसांपासून हा वाद अधिकच तीव्र झाला होता. अखेर शनिवारी संध्याकाळी संतापाच्या भरात चंद्रकांतने घरात असलेला कुरुंदाचा दगड उचलून थेट आपल्या आईच्या डोक्यात घातला. अचानक झालेल्या या हल्ल्यात सुनंदा कांगणे गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ गावकऱ्यांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.
या घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत मुलानेच घराच्या वादातून आईवर हल्ला केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आरोपी चंद्रकांत कांगणे याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पत्नीची निर्घृण हत्या, पोटातले आतडे बाहेर काढले नंतर…
बीड जिल्ह्यातील परळी येथून एक धक्कादाय घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील डाबी येथे पतीने पत्नीवर धारदार चाकूने वार करत हत्या केल्याचे समोर आले आहे. ही हत्या मध्यरात्री घडली. सकाळी घरातीक मुले उठल्यानंतर ही बाब समोर आली आहे. शोभा मुंडे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे तर तुकाराम मुंडे असं आरोपीचे नाव आहे. तुकाराम हा फरार झाला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्यात येत आहे. दरम्यान याच तुकाराम मुंडे यांनी तीन वर्षांपूर्वी शोभा मुंडे यांना जबर मारहाण केली होती, त्या प्रकरणात देखील गुन्हा दाखल झाला होता.
Jalna Crime: ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञातांनी पेटवली, जालन्यात रात्री काय घडलं?