Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलिसांचा सराईतांना दणका, एकाच वेळी तब्बल २२ जण तडीपार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा बडगा

पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेसह गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार परिमंडळ सातच्या हद्दीत विविध पोलिस ठाण्यातंर्गत तब्बल २२ सराईतांना एकाचवेळी तडीपार करण्यात आले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 13, 2026 | 05:02 PM
पुणे पोलिसांचा सराईतांना दणका, एकाच वेळी तब्बल २२ जण तडीपार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा बडगा

पुणे पोलिसांचा सराईतांना दणका, एकाच वेळी तब्बल २२ जण तडीपार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा बडगा

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेसह गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार परिमंडळ सातच्या हद्दीत विविध पोलिस ठाण्यातंर्गत तब्बल २२ सराईतांना एकाचवेळी तडीपार करण्यात आले. पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी तडीपारीचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपुर्वी परिमंडळ दोनमधील १२ जणांना तडीपार केले होते. पुणे पोलिसांकडून गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरोधात कारवाई सुरू केली आहे. तडीपार तसेच  प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. यानुसार, परिमंडळ सात अंतर्गत विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल २२ सराईत गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ५५, ५६ आणि ५७ अन्वये तडीपारी केली आहे.

विमानतळ, चंदननगर, वाघोली, लोणीकंद आणि लोहगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संबंधित गुन्हेगार असून, त्यांच्यावर विविध गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्यात जीवघेणा हल्ला, गुन्ह्याचा कट रचणे, बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगणे, व्हिडिओ प्रसारित करून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणे, धमकी देणे, जबरी चोरी, दहशत निर्माण करणे, गंभीर दुखापत करणे या गुन्ह्यांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा : गणेशोत्सवात गुंडगिरीला लगाम, तब्बल 2573 जणांना पोलिसांचा दणका; 58 सराईत गुन्हेगार तडीपार

तडीपार केलेल्या गुन्हेगारांची नावे

गुलाम उर्फ गुड्डू नवरुलहक मुस्तफा खान, शुभम सुखदेव सोनवणे, दीपक तुकाराम गायकवाड, अतुल गौतम ढोकरे, अनिल साहेबराव वीर, मुकेश बजरंग बुरुंगे, सागर गौतम अवधूत, आरती संजय साठे उर्फ जमदाडे, रिना पवन राजपूत, सागर राजू उर्फ राजेंद्र भालसिंग, सचिन किसन शिंदे, हर्षद कुमार शिंदे, रोशन कुमार साहू, अंजिक्य दादासाहेब मस्कुटे, संतोष गोविंद जाधव, प्रकाश बाबुराव शिवभक्ते, दत्तात्रय रंगनाथ गायकवाड, सुमित सुशील बोरगे, गणेश जालिंदर गलांडे, महेश देवराम लोंढे, अतिश उमेश डिंगरे, सुमित उर्फ बंटी रणजित गायकवाड यांना तडीपार करण्यात आले आहे.

परिमंडळ सात मधील १०० हून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणखी १०० हून अधिक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. -अबिनाश कुमार, पोलिस उपायुक्त, परिमंडळ सात

हडपसरमधून दोघांना तडीपार

हडपसरमधील दोन सराइतांना परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी तडीपार केले आहे. मुसा अबू शेख (वय २५, रा. आनंदनगर, रामटेकडी, हडपसर), अशोक महादेव राऊत (वय २८, रा. सुरक्षानगर, हिंगणे मळा, हडपसर) अशी तडीपार केलेल्या सराइतांची नावे आहेत. शेख याच्यावर मारामारीचे चार गुन्हे दाखल आहेत. राऊत याच्याविरुद्ध गावठी दारू विक्री प्रकरणात गुन्हे दाखल आहेत.

गेल्या तीन महिन्यात वानवडी पोलिसांनी १४० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) तीन गुंडांवर कारवाई करण्यात आली. तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये गुंड टोळीविरुद्ध कारवाई करण्यात आली. तर सराइतांना तडीपार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: The pune police have taken action to extern several criminals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • Arrested News
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान; ‘आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात संपन्न
1

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान; ‘आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात संपन्न

Ahilyanagar : जमीन व्यवहारात डॉक्टरची फसवणूक; माजी नगरसेवकासह चौघांवर मोक्का कारवाई
2

Ahilyanagar : जमीन व्यवहारात डॉक्टरची फसवणूक; माजी नगरसेवकासह चौघांवर मोक्का कारवाई

Baramati News : बारामतीच्या शाळांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पुणे जिल्ह्यातील 600 ZP शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’
3

Baramati News : बारामतीच्या शाळांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पुणे जिल्ह्यातील 600 ZP शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना
4

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.