Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar : जमीन व्यवहारात डॉक्टरची फसवणूक; माजी नगरसेवकासह चौघांवर मोक्का कारवाई

तब्बल १४ कोटी ६६ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. यातील मुख्य सूत्रधार व भाजपच्या माजी नगरसेवकासह चौघांच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) धडक कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 13, 2026 | 12:03 PM
जमीन व्यवहारात डॉक्टरची फसवणूक; माजी नगरसेवकासह चौघांवर मोक्का कारवाई

जमीन व्यवहारात डॉक्टरची फसवणूक; माजी नगरसेवकासह चौघांवर मोक्का कारवाई

Follow Us
Follow Us:

अहिल्यानगर : सावेडी येथील एका नामांकित डॉक्टरांना जमीन खरेदी-विक्रीच्या विविध व्यवहारांत जाळ्यात ओढून बनावट कागदपत्रे, खोटे मालक आणि बोगस सह्यांच्या आधारे तब्बल १४ कोटी ६६ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. यातील मुख्य सूत्रधार व भाजपच्या माजी नगरसेवकासह चौघांच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) धडक कारवाई केली आहे.

नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस महानिरीक्षकांनी या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिल्याने भू-माफियांचे धाबे दणाणले आहेत. माजी नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे (रा. सावेडी, अहिल्यानगर), अमोल बबन जाधव (रा. मोरगव्हाण, ता. नेवासे), महेश नारायण कुहे आणि भारत फुलमाळी (रा. घोडेगाव, ता. नेवासे) अशी मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. झोपडी कॅन्टीन परिसरातील डॉ. अनिल सूर्यभान आठरे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात ८ नोव्हेंबर २०२५ रोजी हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. आरोपींनी सुरुवातीला डॉक्टरांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना जमिनी दाखवून व्यवहाराचे आमिष दाखवले. प्रत्यक्ष व्यवहाराच्या वेळी जमिनीचे बनावट मालक उभे करून त्यांच्या बनावट सह्या आणि बोगस दस्तऐवज तयार करण्यात आले. या कागदपत्रांच्या आधारे वेळोवेळी कोट्यवधी रुपये उकळत आरोपींनी ही फसवणूक केली.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत मुख्य संशयित अमोल जाधवला बेड्या ठोकल्या. त्यानंतर माजी नगरसेवक स्वप्निल शिंदे व महेश कुन्हे यांना नाशिक कारागृहातून ताब्यात घेऊन या प्रकरणात वर्ग करत अटक केली.

आरोपींनी पूर्वसंजोगाने आणि संघटितरीत्या हा आर्थिक गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी मोक्काचा प्रस्ताव तयार केला. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्यामार्फत पाठवलेल्या या प्रस्तावाची छाननी करून नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस महानिरीक्षकांनी त्यास मंजुरी दिली. सध्या शहर उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

‘मोक्का’ची डबल कारवाई

यापूर्वी स्वप्नील शिंदे याच्या टोळीवर खूनाच्या गुन्ह्यात मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. आता जमीन फसवणुकीच्या या कोट्यवधींच्या प्रकरणात पुन्हा ‘मोक्का’ लागल्यामुळे त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अहिल्यानगरमध्ये तरी बहुदा एखाद्या टोळीवर असा डबल मोक्का लागण्याची ही पहिलीच वेळ असावी. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणलेत.

विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे

स्वप्नील शिंदे आणि त्याच्या साथीदारांवर यापूर्वीही मारामारी, दहशत पसरवणे, बेकायदेशीर जमाव जमवणे यांसारखे विविध गंभीर गुन्हे तोफखाना आणि इतर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.

हे सुद्धा वाचा : पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना

स्वप्नील रोहिदास शिंदेची गुन्हेगारी पार्श्वभूमी

जुलै २०२३ मध्ये सावेडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश दत्तात्रय चत्तर यांच्यावर लोखंडी रॉड आणि शस्त्रांनी प्राणघातक हल्ला झाला होता, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या हत्या प्रकरणात स्वप्नील शिंदे याला मुख्य म्हणून अटक करण्यात आली. या हत्येच्या गुन्ह्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांनी स्वप्नील शिंदे आणि त्याच्या टोळीवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार ‘मोक्का’ कारवाई केली.

Web Title: The police have taken major action against four individuals for defrauding a doctor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

Nagpur Crime : सूनेवर जादुटोणाचा संशय! सासऱ्याने कुऱ्हाडीने वार करून केली हत्या; नंतर स्वतःही विहिरीत मारली उडी
1

Nagpur Crime : सूनेवर जादुटोणाचा संशय! सासऱ्याने कुऱ्हाडीने वार करून केली हत्या; नंतर स्वतःही विहिरीत मारली उडी

बारामती हादरलं ! पणदरेत 30 वर्षीय विवाहितेची हत्या; डोक्यात व चेहऱ्यावर हत्याराने वार केले अन् नंतर…
2

बारामती हादरलं ! पणदरेत 30 वर्षीय विवाहितेची हत्या; डोक्यात व चेहऱ्यावर हत्याराने वार केले अन् नंतर…

शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3

शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…
4

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.