धक्कादायक ! पत्नीने पतीला फेकून मारलेले त्रिशूल चिमुकल्याच्या डोक्यात घुसले; तडफडून झाला मृत्यू
वारणानगर : जाखले (ता. पन्हाळा) येथे हॉलमध्ये ठेवलेले 14 लाख रुपये किंमतीचे 14 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले होते. सोने असलेला बॉक्स चोरलेल्या चोरट्यास अवघ्या सहा दिवसांत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक करून मुद्देमाल जप्त केला.
जाखले येथील सचिन प्रकाश हुजरे यांच्या राहत्या घरातील हॉलमध्ये सुमारे १४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असलेला बॉक्स ठेवलेला होता. ४ जुलै रोजी सायंकाळी अज्ञात चोरट्याने दागिन्यांचा बॉक्स चोरून नेला. याबाबत कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सुचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी गुन्ह्याचा समांतर तपास सुरु केला होता. यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे यांच्या पथकाने तपास सुरू केला होता.
दरम्यान, या पथकाने गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन तांत्रिक व भौगोलिकदृष्ट्या माहिती घेऊन या गुन्ह्याचा तपास केला. अक्षय पवार याने चोरलेल्या सोन्याच्या दागिन्यात ३० ग्रॅम वजनाचे पदक असलेले सोन्याचे गंठण, ११ ग्रॅम वजनाचा सोन्याचा चोकर, २० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, ६० ग्रॅमचे सोन्याचे गंठण, २० ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार असे १४ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तपास पथकाने जप्त केले. कोडोली पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार हिंदुराव केसरे, संजय पडवळ, वसंत पिंगळे, अमित सर्जे, अनिकेत मोरे व सतिश सुर्यवंशी यांच्या पथकाने सहा दिवसात चोरीचा छडा लावला.
भाड्याच्या घरात राहत होता चोरटा
तपास पथकातील पोलिस अंमलदार हिंदुराव केसरे यांना गोपनीय खबऱ्यामार्फत अक्षय शंकर पवार (मूळगाव बोरपाडळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, सध्या सह्याद्री कॉलनी अमृतनगर, रा. पारगाव (ता. हातकणंगले) या ठिकाणी भाड्याने राहत असल्याची माहिती मिळाली. अक्षय पवार याचे फिर्यादी सचिन हुजरे यांच्याकडे व शेजारी राहणाऱ्या लोकांकडे येणे-जाणे होते. त्यानेच हा गुन्हा केला आहे, अशी पक्की माहिती मिळाली.
पोलिसांनी शोध घेतला अन्…
तपास पथकाने अक्षय पवार याचा शोध घेत त्याला ९ जुलै रोजी ताब्यात घेतले. त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. विश्वासात घेऊन सखोल तपास केला असता त्याने जाखले येथील सचिन हुजरे यांच्या घरी केलेल्या चोरीची कबुली दिली.