Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: नाशिक शहर पुन्हा एकदा जाणार खड्यात…! मुख्य २९ रस्त्यांच्या बळकटीकरणाचे काम सुरू; सहा यंत्रणा खोदणार खड्डे

नाशिक शहरातील २९ रस्त्यांचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याने तत्पुर्वी या रस्त्याच्या खालून पाणी पुरवठा, मलनिस्सरण, ओएफसी केबल, सीसीटीव्ही कॅमेरे, गॅस पाईपलाईनची कामे केली जाणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 26, 2026 | 05:50 PM
नाशिक शहर पुन्हा एकदा जाणार खड्यात...! मुख्य २९ रस्त्यांच्या बळकटीकरणाचे काम सुरू; सहा यंत्रणा खोदणार खड्डे (फोटो सौजन्य - Gemini)

नाशिक शहर पुन्हा एकदा जाणार खड्यात...! मुख्य २९ रस्त्यांच्या बळकटीकरणाचे काम सुरू; सहा यंत्रणा खोदणार खड्डे (फोटो सौजन्य - Gemini)

Follow Us
Close
Follow Us:
  • नाशिक शहर पुन्हा एकदा जाणार खड्यात
  • मुख्य २९ रस्त्यांच्या बळकटीकरणाचे काम सुरू
  • सहा यंत्रणा खोदणार खड्डे
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी शहरातील २९ रस्त्यांचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याने तत्पुर्वी या रस्त्याच्या खालून पाणी पुरवठा, मलनिस्सरण, ओएफसी केबल, सीसीटीव्ही कॅमेरे, गॅस पाईपलाईनची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे या प्रमुख रस्त्यांची पुन्हा एकदा धुळधाण उडणार असून, सदरची कामे येत्या तीन महिन्यात पुर्ण न झाल्यास पावसाळ्यात पुन्हा एकदा नाशिककरांना खड्धांतून प्रवास करावा लागणार आहे.

वस्त्रनगरीचा पहिला महापौर कोण? अनुभवी सदस्यांसह नवख्या सदस्यांत रस्सीखेच

प्रामुख्याने शरणपूर रोड (शरणपूर पोलिस चौकी ते जुना गंगापूर नाका), जुना गंगापूर नाका परिसर, कॅनडा कॉर्नर ते कॉलेज रोड, कॉलेज रोडवरील निवडक टप्पे, टिळकवाडी परिसरातील अंतर्गत रस्ते, मायको सर्कल चौक, जेहान सर्कल परिसर, महात्मानगर मुख्य रस्ता, एबीबी सिग्नल परिसर, पंपिंग स्टेशन रोड, सावतानगर लिंक रोड, परशुराम सायखेडकर नाका परिसर, गंगापूर रोडवरील सर्व रस्ते, गोल्फ क्लब परिसरातील रस्ता, विद्यानगर सावतानगर जोड रस्ता, नत्रश्या गणपती परिसरातील अंतर्गत मार्ग, अशोक स्तंभ परिसर, त्र्यंबक रोडवरील काही टप्पे, कॉलेज रोड गंगापूर रोड जोडणारे अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांवर गंगापूर थेट पाईपलाईन, अमृत योजनेतील पाणी पुरवठा योजनेची कामेही केली जाणार आहेत. यासह अन्य काही रस्त्यांवर गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी एमएनजीएलने सुमारे २९० किलो मीटरचे रस्ते खोदण्यासाठी मनपाकडे परवानगी मागितली आहे.

नागरिकांना होतोय नाहक त्रास

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने ही कामे महत्वाची असून, ती वेळेत पूर्ण करण्यासाठी यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे. एकाच वेळी सर्वच ठिकाणचे कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे नाशिककरांना रस्ते व त्यावरील खड़े चुकवितव मार्गक्रमण करावे लागणार आहे.

पावसाळा अजून पाच महिन्यावर असला तरी गेल्या वर्षावा अनुभव पाहता, मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाने शहरात हजेरी लावून आपला मुक्काम चार महिने कायम ठेवला होता, शहरातील खड़े कायम असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला, त्यानंतर काही प्रमाणात महापालिकेने खड़े बुजविणे व काही नवीन रस्ते तयार केलेले असताना आता पुन्हा नव्याने संकट उभे ठाकले आहे. पावसाळ्यापूर्वी कामे न झाल्यास यंदाही खङ्ख्यांतून प्रवास करावा लागणार आहे.

Ahilyanagar News: ‘बेटी बचाव’ फक्त फक्त घोषणा ठरणार का? छेडछाडीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण

Web Title: Nashik city is once again going to be full of potholes strengthening work on the main 29 roads has begun six machines will dig the potholes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik

संबंधित बातम्या

कष्टकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मुंबईच्या दिशेने, किसान सभेचा मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा; २ फेब्रुवारीला मुंबईत धडकणार
1

कष्टकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मुंबईच्या दिशेने, किसान सभेचा मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा; २ फेब्रुवारीला मुंबईत धडकणार

Girish Mahajan: “मुद्दामून नाव डावलण्याचा….”; डॉ. आंबेडकरांच्या नाव न घेतलेल्या गोंधळावर गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण, म्हणाले..
2

Girish Mahajan: “मुद्दामून नाव डावलण्याचा….”; डॉ. आंबेडकरांच्या नाव न घेतलेल्या गोंधळावर गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण, म्हणाले..

“बाबासाहेबांचं नाव भाषणात का नाही घेतलं?” सरकारी कर्मचारी गिरीश महाजनांवर संतापली, म्हणाली “सस्पेंड केलं तरी चालेल, पण…”
3

“बाबासाहेबांचं नाव भाषणात का नाही घेतलं?” सरकारी कर्मचारी गिरीश महाजनांवर संतापली, म्हणाली “सस्पेंड केलं तरी चालेल, पण…”

Dharashiv News: एबी फॉर्म वादाने धाराशिव शिवसेनेत उघडी फूट; पालकमंत्र्यांसमोर तीन तास गोंधळ, महायुतीच्या जागावाटपावर प्रश्नचिन्ह
4

Dharashiv News: एबी फॉर्म वादाने धाराशिव शिवसेनेत उघडी फूट; पालकमंत्र्यांसमोर तीन तास गोंधळ, महायुतीच्या जागावाटपावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.