Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिंताजनक! मुली पळून जाण्याच्या घटनांत मोठी वाढ; ग्रामीण भागात अल्पवयीन प्रेमप्रकरणेही वाढले

राज्यातील शहरी भागासह ग्रामीण भागांत अल्पवयीन मुला–मुलींमध्ये वाढत्या प्रेमप्रकरणांमुळे घर सोडून पळून जाण्याच्या घटनांत लक्षणीय वाढ होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 01, 2026 | 02:33 PM
चिंताजनक! मुली पळून जाण्याच्या घटनांत मोठी वाढ; ग्रामीण भागात अल्पवयीन प्रेमप्रकरणेही वाढले

चिंताजनक! मुली पळून जाण्याच्या घटनांत मोठी वाढ; ग्रामीण भागात अल्पवयीन प्रेमप्रकरणेही वाढले

Follow Us
Follow Us:
  • मुली पळून जाण्याच्या घटनांत मोठी वाढ
  • ग्रामीण भागात अल्पवयीन प्रेमप्रकरणेही वाढले
  • बारामती तालुक्यातही घटनांमध्ये वाढ
माळेगाव/प्रदीप जगदाळे : राज्यातील शहरी भागासह ग्रामीण भागांत अल्पवयीन मुला–मुलींमध्ये वाढत्या प्रेमप्रकरणांमुळे घर सोडून पळून जाण्याच्या घटनांत लक्षणीय वाढ होत आहे. चिंताजनक चित्र समोर येत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही अशा घटनांचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः बारामती तालुक्यात गेल्या काही महिन्यांत अल्पवयीन मुली घरातून निघून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

 

पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, अनेक प्रकरणांत सोशल मीडियावरील ओळख, मोबाईलवरील सततचा संपर्क आणि ऑनलाईन चॅटिंगमधून जवळीक वाढत असल्याचे आढळून आले आहे. काही मुली आकर्षणाला प्रेम समजून क्षणिक भावनेतून घर सोडण्याचा निर्णय घेतात. मात्र, अशा निर्णयामुळे त्यांच्या शिक्षणावर, भविष्यातील करिअरवर आणि कुटुंबीयांच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम होतो. एका सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीत वाढ दिसून येत आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये त्या ओळखीच्या तरुणासोबत गेल्याचे निष्पन्न होते. पालकांनी मुलांशी संवाद वाढवणे आणि त्यांच्या मोबाईल वापरावर संयमित लक्ष ठेवणे गरजेचे आहे.”

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, वेब सिरीज, चित्रपट आणि सोशल मीडियावरील आशयामुळे अल्पवयीन मुलांना प्रौढ विषयांची लवकर ओळख होते; परंतु जबाबदारीची जाणीव आणि परिणामांची समज विकसित झालेली नसते. त्यामुळे शिक्षण अर्धवट राहणे, आर्थिक अस्थैर्य आणि सामाजिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता वाढते. बारामतीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, गावपातळीवर पालक मेळावे, शाळांमध्ये जागृती अभियान आणि समुपदेशन केंद्रांची गरज आहे. “मुलांवर बंधने लादण्यापेक्षा त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधणे अधिक परिणामकारक ठरेल,” असे त्यांनी सांगितले.

पालकांनी मुलांच्या भावना समजून घ्याव्या

या पार्श्वभूमीवर पालकांनी मुलांच्या भावना समजून घेणे, त्यांना योग्य दिशा देणे आणि तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्यास प्रवृत्त करणे अत्यावश्यक आहे. अल्पवयीन प्रेमप्रकरणांची वाढ ही केवळ वयक्तिक नव्हे, तर सामाजिक आणि भावनिक जाणीवेची समस्या बनत चालली आहे. समाज, पालक, शैक्षणिक संस्था आणि प्रशासन यांनी एकत्रित प्रयत्न केल्यासच या घटनांना आळा बसू शकतो. कारण क्षणिक आकर्षण तात्पुरता आनंद देईल; पण विचारपूर्वक घेतलेला निर्णयच आयुष्यभर समाधान देणारा ठरेल.

“हार्मोन्सचा शारीरिक विकास लवकर होतो; मात्र भावनिक परिपक्वता त्याच वेगाने विकसित होत नाही. त्यामुळे आकर्षण आणि प्रेम यातील फरक समजून घेण्याची क्षमता कमी असते. शाळा–महाविद्यालयांमध्ये समुपदेशन सत्रे वाढवण्याची गरज आहे.” – एक प्राध्यापक, स्थानिक महाविद्यालय

Web Title: There has been a huge increase in underage love affairs in rural areas of pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • crime news
  • love story
  • maharashtra

संबंधित बातम्या

Jharkhand News : नोकरीसाठी मुलानेच दिली वडिलांच्या खूनाची सुपारी, 10 लाख देऊन रचला भयानक हत्याकांड
1

Jharkhand News : नोकरीसाठी मुलानेच दिली वडिलांच्या खूनाची सुपारी, 10 लाख देऊन रचला भयानक हत्याकांड

झारखंडच्या रामगड जिल्ह्यात भीषण अपघात; ट्रक-प्रवासी वाहनात जोरदार धडक, सात जणांचा मृत्यू
2

झारखंडच्या रामगड जिल्ह्यात भीषण अपघात; ट्रक-प्रवासी वाहनात जोरदार धडक, सात जणांचा मृत्यू

ग्रामीण महाराष्ट्रातील ‘घुगुळ’ची प्री-वेडिंग परंपरा! कुलदेवतेला लग्नाला बोलावण्याची अनोखी प्रथा!
3

ग्रामीण महाराष्ट्रातील ‘घुगुळ’ची प्री-वेडिंग परंपरा! कुलदेवतेला लग्नाला बोलावण्याची अनोखी प्रथा!

डोक्यावर पाण्याची कळशी आणि रुखवताच्या टोपल्या! ग्रामीण महाराष्ट्रातील ‘बडाम नाचवण्याची’ ही अनोखी परंपरा तुम्हाला माहित आहे का?
4

डोक्यावर पाण्याची कळशी आणि रुखवताच्या टोपल्या! ग्रामीण महाराष्ट्रातील ‘बडाम नाचवण्याची’ ही अनोखी परंपरा तुम्हाला माहित आहे का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.