
वारजेत खळबळ ! अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; दोघांनी...
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हे मुळचे उत्तरप्रदेश गोरखपुर येथील आहेत. ते पुण्यात बिगारी कामगार म्हणून काम करतात. पिडीत मुलगी परराज्यातील आहे. ते एकाच भागात राहण्यास आहेत. पिडीत मुलीचे कुटूंबिय बाहेर कामानिमित्त गेल्यानंतर आरोपींनी घरात घुसून तिच्यावर अत्याचार केले. जुन महिन्यापासून आरोपी तिच्यावर लैंगीक अत्याचार करत होते. यातून पिडीत मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर हा प्रकार तिच्या कुटूंबियाच्या लक्षात आला. नंतर तिच्या घरच्यांनी तिच्याकडे विचारपुस केली. तेव्हा तिने आरोपींने केलेल्या कृत्याची कहाणी कुटूंबियांना सांगितली. नंतर कुटूंबियांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
लैंगिक अत्याचारानंतर करायला लावला गर्भपात
लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर तरुणी गर्भवती राहिल्याने तिचा गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी २७ वर्षीय पीडितेने तक्रार दिली आहे. त्यावरून अक्षय रमेश पैके (२९, रा. मालेगाव रोड, चातोरी, ता. पालम, जि. नांदेड) याच्याविरोधात वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अक्षय पैके याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे तरुणी गर्भवती राहिली. त्यावेळी अक्षय पैके याने पीडितेची इच्छा नसताना तिला जबरदस्तीने गोळ्या आणि औषधी काढा देऊन तिचा गर्भपात केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. हा प्रकार २०१९ ते ऑगस्ट २०२५ च्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त पठारे करत आहेत.