Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन दिवाळीत लूटमारीच्या घटनेमुळे घबराट; बाजीराव रस्त्यावर व्यावसायिकाला अडवले अन्…

बाजीराव रोड परिसरात व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडील १ लाख ३० हजारांची रोकड लुटल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 18, 2025 | 04:33 PM
ऐन दिवाळीत लूटमारीच्या घटनेमुळे घबराट; बाजीराव रस्त्यावर व्यावसायिकाला अडवले अन्...

ऐन दिवाळीत लूटमारीच्या घटनेमुळे घबराट; बाजीराव रस्त्यावर व्यावसायिकाला अडवले अन्...

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यात लुटमारीच्या घटना वाढल्या
  • बाजीराव रस्त्यावर व्यावसायिकाला लुटले
  • ऐन दिवाळीत लूटमारीच्या घटनेमुळे घबराट

पुणे : राज्यासह देशभरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. बाजीराव रोड परिसरात व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडील १ लाख ३० हजारांची रोकड लुटल्याची घटना घडली आहे.

पुणे शहरात सातत्याने एकट्या नागरिकांना धमकावून लुटले जात असताना पोलिसांना या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ६० वर्षीय व्यावसायिकाने खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक असून, त्यांचे सदाशिव पेठेतील कुमठेकर रस्ता भागात इमिटेशन ज्वेलरीचे दुकान आहे. एक ग्रॅम सोन्याचे दागिन्यांची विक्री केली जाते. दिवाळीमुळे गुरुवारी रात्री उशीरापर्यंत दुकान सुरू होते. व्यावसायिक शुक्रवार पेठेत राहायला आहेत. रात्री साडेदहाच्या सुमारास दुकान बंद करुन व्यावासायिक दुचाकीवरुन घरी निघाले होते. व्यवसायातून जमा झालेली एक लाख ३० हजारांची रोकड त्यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. बाजीराव रस्त्यावरील टेलीफोन भवनजवळील गल्लीतून ते रात्री घरी निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना अडवले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. व्यावसायिकाला धक्काबुक्की केली. व्यावसायिकाने घाबरून दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली एक लाख ३० हजारांची रोकड चोरट्यांना दिली. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती घाबरलेल्या व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी बाजीराव रस्ता, सुभाषनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे.

कालची लूटमारीची घटना

पुणे शहरात लुटमारीच्या घटना घडत असून, मार्केडयार्ड परिसरात एका दुचाकीस्वार व्यापाऱ्याला धमकावून त्याच्याकडील ४५ हजारांची रोकड लुटल्याची घटना बिबवेवाडी-गंगाधाम रस्त्यावर घडली होती. त्यातील आरोपी देखील पसार आहेत. त्यांचाही पोलिसांना थांगतप्ता लागलेला नाही. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आणखी एक घटना घडली असून, ऐन सनासुदीच्या काळात लुटमारीच्या घडत असल्याने व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

Web Title: There has been an incident of thieves robbing a businessman on bajirao road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 04:33 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

बंडू आंदेकर टोळीतील आणखी एका गुंडाला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरातून सापळा रचून पकडले
1

बंडू आंदेकर टोळीतील आणखी एका गुंडाला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरातून सापळा रचून पकडले

Pune Crime: कोंढव्यात झटापटीत गांजा तस्करीतील आरोपीचा मृत्यू; मीरा भाईंदर पोलिसांची कारवाई
2

Pune Crime: कोंढव्यात झटापटीत गांजा तस्करीतील आरोपीचा मृत्यू; मीरा भाईंदर पोलिसांची कारवाई

महिलांना धमकी देत अश्लील वर्तन करणं तरुणाला भोवलं; पोलिसांत गुन्हा दाखल
3

महिलांना धमकी देत अश्लील वर्तन करणं तरुणाला भोवलं; पोलिसांत गुन्हा दाखल

पुण्यातील कुख्यात निलेश घायवळ परदेशात फरार; पासपोर्ट न जमा केल्याने पुणे पोलिसांची जामीन रद्द करण्याची उच्च न्यायालयात याचिका
4

पुण्यातील कुख्यात निलेश घायवळ परदेशात फरार; पासपोर्ट न जमा केल्याने पुणे पोलिसांची जामीन रद्द करण्याची उच्च न्यायालयात याचिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.