crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
नागपुरातून एक चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अज्ञात आरोपीने चक्क पार्सल देण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या घरात प्रवेश केला आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून फरार झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना नागपुरातील अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या अश्विनी मेश्राम यांच्या घरी घडली आहे.
Crime News : ग्राहक बोलविण्यावरुन वाद; दोन मटण दुकान मालकांत हाणामारी
नेमकं काय घडलं?
अश्विनी मेश्राम हे घरात एकट्या होत्या, त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती पार्सल घेऊन आल्याचे सांगत असताना त्यांच्या घरी गेला. अश्विनी यांना वाटले की त्यांच्या मुलाने जेवणाचे पार्सल पाठवले असेल, म्हणून त्यांनी कोणताही संशय न घेता दरवाजा उघडला. त्या व्यक्तीने त्यांना एका कागदावर सही करायला सांगितले. अश्विनी सही करत असतांना आरोपी हा त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावली. या झटापटीत मंगळसूत्रातील 3 ग्रॅम सोन्याचा भाग आरोपीच्या हातात आला आणि तो घेऊन त्याने तात्काळ तिथून पळ काढला.
अश्विनी मेश्राम यांनी आरडाओरड केली, पण शेजारचे येईपर्यंत चोरटा पळून गेला होता. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
गुन्हा दाखल
घटनेनंतर अश्विनी यांनी पोलिसठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीची आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आता पोलिसांसमोर आरोपीला लवकरात लवकर पकडण्याचे आव्हान समोर आले आहे.
ररस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार; हल्लेखोरांनी ५० लाख लुटले
नागपूरमध्ये एका व्यापाऱ्याला गोळीबार करत दरोडेखोरांनी लुटले. या घटनेत व्यापारी जखमी झाला आहे. ही घटना नागपूरच्या कडबी चौकात भर रस्त्यावर बुधवारी रात्री घडली आहे. पोलिसांनी लुटलेली रक्कम हवालाशी निगडित असल्याचा संशय आहे. या घटनेने नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
राजू दिपानी (जरीपटका) असे जखमीचे नाव आहे. ते व्यापारी असून गुजरातमधील एका कंपनीसाठीदेखील डेटा फिडिंगचे काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे 10 नंबर पुलाजवळ कार्यालय आहे. रात्री आठ वाजताच्या सुमारास राजू दिपानी कार्यालयातून निघाले व चौकातून आतील भागात शिरले. तेथे बाबा नावाच्या व्यक्तीच्या घरासमोरून ते दुचाकीने जात असताना मोटारसायकलवरून दोन आरोपी आले व त्यांनी दिपानी यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातात स्प्रे पाहून दिपानी यांनी धोका ओळखून तेथून निघण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांच्यावर पिस्तुलाने तीन गोळ्या झाडल्या. त्यांच्याकडील ५० लाख रुपये लुटले. राजू दिपानी हे या घटनेत जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. बंधित रक्कम हवालाशी निगडीत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
Nashik Accident: भीषण अपघात! पिकअप आणि कारची समोरासमोर जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू तर…