CRIME (फोटो सौजन्य : SOCIAL MEDIA)
नागपूरमधून के असं प्रकरण समोर आलं आहे की ज्यामुळे पोलिसही हैराण झाले आहेत. तुम्ही अनेकदा चोरीच्या घटना ऐकल्या असेल परंतु आज जी चोरीची घटना मी सांगणार आहे ते ऐकून तुम्ही देखील हैराण होणार. असं काय नेमकं घडलं? चला जाणून घेऊया.
Nagpur Murders : उपराजधानी नागपुरात चाललंय तरी काय? अवघ्या २४ तासात ३ हत्या; शहरात खळबळ
नागपूरच्या एका बियर शॉपमध्ये २५ हजारांची चोरी झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी शॉपमधलं सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केलं आणि ते तपासलं असता समोर जे दिसलं ते पाहून पोलीस हैराण झाले. पैश्यांसाठी त्या चोराने जे केलं त्याने सगळेच हैराण झाले. दुकानातून बॉटल विक्री करणाऱ्या खिडकीतून चक्क आत घुसून चोरी केली. बिअर शॉपच्या काऊंटरला असलेले ग्रील न कापता आत घुसणं आणि चोरी करणं म्हणजे अश्कयचं होतं. पण तरीही चोर आत घुसला आणि कॅश काऊंटरमधील 25 हजार रुपये पळवले. हे बघून सगळेच हैराण झाले. आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. आरोपीचं नाव शेख बाबा असे अटकेतील आरोपीचं नाव आहे. ही चोरीची घटना ६ जून रोजी घडली आहे.
या लवचिक चोराचे व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये चोर आधी शॉपची पाहणी करताना दिसत आहे. त्याने काळ्या रंगाचे कपडे घातलेले दिसत आहे. तरुणाने दुकानाची नीट पाहणी केली. थोड्या काळाने तो पुन्हा सीसीटीव्हीमध्ये दिसला. त्याने खालून थेट काउंटरवर उडी मारली आणि एका अरुंद जागेतून बियर शॉपमध्ये शिरला. ज्या जागेतून ग्राहक दारूचे पैसे देतात आणि बॉटल घेतात, चोर त्याच जागेतून लवचिकपणे आत घुसला. रबरसारखे शरीर वाकवून आत गेला आणि काऊंटर बॉक्समधून पैसे चोरल्यानंतर तो त्याच अरुंद जागेतून बाहेर पडला.
पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घ्याला सुरवात केली तेव्हा चोर वाठोडा पोलिस स्टेशन हद्दीतील रामश्री बियर बारमध्ये शेख राजा शेख बाबा नावाच्या 20 वर्षीय चोराने ही चोरी केली असल्याचे समोर आले आहे. तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि बेड्या ठोकल्या. त्याने चोरी केल्याची कबुली तर दिली आणि अमरावती येथून काही दुचाकीही चोरल्या होत्या असेही तपासात आढळून आलं आहे. नागपूर पोलिसांच्या क्राईम युनिट ४ पथकाने १३ जूनला अटक केली आहे. आरोपी शेख राजा शेख बाबा हा मूळचा अमरावतीचा आहे. तो काही दिवसांपूर्वी त्याच्या कुटुंबासह नागपूरला आला होता. अरुंद ठिकाणी घुसून चोरी करण्यात हा चोर तज्ज्ञ आहे.
आयटी कंपनीतील २२ वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; घरात सापडली चिठ्ठी