ग्रा. पं सदस्याची निघृण हत्या (फोटो सौजन्य : social media)
उपराजधानी नागपूर मध्ये काही केल्या गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाही आहे. अवघ्या २४ तासात शहर आणि ग्रामीण भागात तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पुणे पोलीस अॅक्शन मोडवर, अवजड वाहनांवर थेट गुन्हे दाखल; दोन दिवसात तब्बल…
पहिली हत्या:
गोरेवाडा जंगल परिसरात प्रेमसंबंधातून करण्यात आली. मृतकाचे नाव अमान गजेंद्र ध्रुववंशी (20, रा. मानकापूर) असे आहे. या घटनेत आरोपींनी अमनला भेटण्याच्या बहाण्याने बोलावले आणि गोरेवाडा जंगल परिसरात त्याची निर्घृण हत्या केली. ही घटना शनिवारी रात्री घडली असून रविवारी दुपारी एका आरोपीने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा कबूल केला. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.
दुसरी हत्या:
खापा येथील गांधी चौकात तीन गोळ्या झाडून एकाची हत्या करण्यात आली. जुन्या वादातून हि हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र या हत्येमागचा नेमका कारण काय आहे अद्याप समोर आला नाही आहे. ही हत्या भरदिवसा रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सिनेस्टाईल पाठलाग करत करण्यात आली. मृतकाचे नाव चेतन अशोक गागटे (31, रा. हनुमान घाट) असे आहे. तर आरोपीचे नाव अर्जुन निळे असे आहे. आरोपी अर्जुनने चेतनवर तीन गोळ्या झाडल्या. यात त्याचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर आरोपी अर्जुन स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केला. पोलीस अधिक तपास करत आहेत.
तिसरी हत्या:
नागपुरातील कुही तालुक्यातील पाचगाव भागात एका चौकीदाराची हत्या करण्यात आली. चाकीदाराची नोकरी करणाऱ्या सुमंतलाल मरस्कोल्हे याचे हातपाय बांधून निर्घृण खून करण्यात आला. कळमना- उमरेड मार्गावरील एका बांधकाम स्थळावर हत्येची ही घटना घडली. त्या ठिकाणी कामावर असलेल्या तीन मजुरांनीच हा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र हा खून का करण्यात आला हे अद्याप समोर आलेलं नाही आहे.
Daund-Pune Demu Train Fire: दौंड-पुणे डेमू ट्रेनमध्ये टॉयलेटला आग; शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज