Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चावी तयार करणाराच निघाला चोर; दहा हजारांच्या रोकडसह दोन दुचाकीही चोरल्या

आरोपी तेजपालसिंग हा सुरतवरून निघाल्यानंतर नागपूर, अकोला, रामटेक अशा आदी शहरात फिरून चावी बनविण्याचा बहाणा करत फिरत होता. तो दारोदारी फिरून नागरिकांच्या घराच्या कुलूपाच्या चाव्या बनवून देत होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 09, 2025 | 01:17 PM
चावी तयार करणाराच निघाला चोर

चावी तयार करणाराच निघाला चोर

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न यासह चोरी, दरोड्याची प्रकरणेही समोर येत आहेत. त्यात आता अमरावतीत दारोदारी फिरून कुलूपाच्या चावी तयार करण्याचा बहाणा करत घरफोडी करणाऱ्या एका आरोपीला राजापेठ पोलिसांनी बुलडाण्यातून शनिवारी (दि. 8) अटक केली.

तेजपालसिंग निहालसिंह भाटिया (वय 35, रा. सुरत, गुजरात) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रवीनगरात केलेल्या घरफोडीची कबुली दिली. आरोपी मूळचा गुजरात राज्यातील असून, तो विविध शहरात फिरून चावी विकण्याचा बहाणा करून नागरिकांच्या घराची रेकी करीत होता. 29 डिसेंबर 2024 रोजी रविनगरातील रहिवासी खेडकर यांच्या घरात अज्ञात चोराने चोरी करून मोबाईल, चांदीचे दागिने व दहा हजाराची रोख लंपास केली होती.

दरम्यान, त्यांच्या घरासमोरील दुसरे घरसुद्धा फोडण्यात आले होते. या घटनेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्याचा तपास राजापेठ पोलिस करत होते. पोलिसांनी तपास करून आरोपी निष्पन्न केला. त्यानंतर पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, राजापेठचे पोलिस निरीक्षक पुनिट कुलट यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख पोलिस हवालदार मनीष करपे, पंकज खटे, सागर बजगवरे, रवी लिखितकर यांच्या पथकाने बुलढाणा जाऊन आरोपी तेजपालसिंगला मोठ्या शिताफीने अटक केली. त्याला 8 मार्च रोजी अमरावतीत आणले गेले. त्याची जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

नागपुरातून चोरल्या दोन दुचाकी

आरोपी तेजपालसिंग हा सुरतवरून निघाल्यानंतर नागपूर, अकोला, रामटेक अशा आदी शहरात फिरून चावी बनविण्याचा बहाणा करत फिरत होता. तो दारोदारी फिरून नागरिकांच्या घराच्या कुलूपाच्या चाव्या बनवून देत होता. अशातच तो रेकी करून बंद घरांना लक्ष्य करायचा. त्यानंतर तो मध्य प्रदेशातील एका नातेवाईकाच्या घरी जाऊन राहत होता आणि तेथे चोरीचा मुद्देमाल विकत होता. ही बाब पोलिस चौकशीत पुढे आली आहे. तो अमरावती येण्यापूर्वी रामटेक व नागपुरात होता. त्याने नागपुरात दोन दुचाकी चोरल्याचीही कबुली दिली आहे.

Web Title: Thieve arrested in amravati nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 01:17 PM

Topics:  

  • Amravati crime
  • Amravati News
  • Robbery case

संबंधित बातम्या

Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी
1

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.