श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशनच्या कार्य क्षेत्रामधील पिंपरी चौफुला ढवळगाव, व इतर गावातील किराणा दुकान, कृषी सेवा केंद्र या दुकानांचे शटर फोडून दुकानांमध्ये किरकोळ रोख रक्कम व किरकोळ मालाची चोरी अज्ञान चोरट्यांनी केली आहे. ढवळगाव मधील महालक्ष्मी किराणा स्टोअर, स्वप्निल अॅग्रो, पिंपरी चौफुला येथील श्री ओहोळ कृषी सेवा केंद्र, ओम साई कृषी सेवा केंद्र, जय किसान कृषी सेवा केंद्र तसेच इतर काही किराणा दुकान व कृषी मालाच्या दुकानांचे शटर फोडण्यात आले.
रात्रीच्या गस्तीवर असणाऱ्या पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत पंचनामा करण्यात केला. सदरील चोरट्यांचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रीत झाले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उप.पोलीस निरीक्षक बोत्रे साहेब, साह्यक फौजदार मारुती कोळपे, पोलीस कॉन्स्टेबल गुंड हे करत आहे.