Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाघोलीतील कंपनीच्या गोदामातून लॅपटाॅप चोरणारे अटकेत; 244 लॅपटाॅप, दोन टेम्पो जप्त

कंपनीच्या गोदामातून चोरीला गेलेल्या एक कोटी रुपयांच्या लॅपटाॅप चोरी प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २४४ लॅपटॉप आणि दोन टेम्पो जप्त करण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 20, 2024 | 11:47 AM
वाघोलीतील कंपनीच्या गोदामातून लॅपटाॅप चोरणारे अटकेत; 244 लॅपटाॅप, दोन टेम्पो जप्त

वाघोलीतील कंपनीच्या गोदामातून लॅपटाॅप चोरणारे अटकेत; 244 लॅपटाॅप, दोन टेम्पो जप्त

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे, पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. चोरट्यांमुळे नागरिकांसोबतचं पोलिसदेखील हैराण झाले आहेत. अशातचं आता वाघोलीतील एका नामांकित कंपनीच्या गोदामातून चोरीला गेलेल्या एक कोटी रुपयांच्या लॅपटाॅप चोरी प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २४४ लॅपटॉप आणि दोन टेम्पो जप्त करण्यात आले.

सुरेश महादेव कुमार (वय ३५, रा. वाघोली, मूळ उत्तर प्रदेश), शिवाजी जगन्नाथ वसू (वय २७, रा. धानेगाव, छत्रपती संभाजीनगर), कुमुद रंजन झा (वय ३२, रा. वाघोली ) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

वाघोलीतील उबाळेनगर परिसरात आर्कलाईन लॉजिस्टीक्स अँड वेअरहाऊस प्रा. लि. गोदामातील कामगाराने एक कोटी नऊ लाख रुपयांचे २८० लॅपटॉप चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंपनीतील कामगार सुरेश कुमारने साथीदारांच्या मदतीने लॅपटाॅप चोरल्याची माहिती तपासात मिळाली होती. याप्रकरणी पोलीस कर्मचारी अजित फरांदे तांत्रिक तपास सुरु केला. तपासात मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून २४४ लॅपटॉप आणि दोन टेम्पो जप्त केले.

गोदामातून चोरलेल्या लॅपटॉपची आरोपींनी नऊ जणांना विक्री केल्याचे उघडकीस आले. आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालायने दिले. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड, सहायक निरीक्षक शिरीष भालेराव, योगेश खटके, अजित फरांदे, स्वप्नील जाधव, अमोल ढोणे, संदीप तिकोणे, विशाल गायकवाड, बाळासाहेब हराळ, सागर कडू यांनी ही कारवाई केली.

Web Title: Those who stole laptops from the warehouse of the company in wagholi were arrested nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 11:47 AM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Maharashtra Badminton Association च्या अध्यक्षपदी अरुण लखानी, तर सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड
1

Maharashtra Badminton Association च्या अध्यक्षपदी अरुण लखानी, तर सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या
2

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये
3

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…
4

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.