Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुडणाऱ्या मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा मृत्यू; रत्नागिरी जिल्ह्यातील घटना

रत्नागिरी जिल्यातील खडपोली रामवाडी येथे दुर्दैवी घटना घडली. वाशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवतांना आई, अत्यासह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 26, 2025 | 11:34 AM
Vashishthi River (फोटो सौजन्य- social media )

Vashishthi River (फोटो सौजन्य- social media )

Follow Us
Close
Follow Us:

रत्नागिरी जिल्ह्यातील खडपोली रामवाडी येथे दुर्दैवी घटना घडली. वाशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवतांना आई, आत्यासह तिघांचा बुडून मृत्यू झाला. वाशिष्ठी नदीचा डोह १२ ते १४ फूट खोल आहे. या ठिकाणी नदीचे पाणी वाहत असते. मृतकाचे नाव लक्ष्मण कदम (वय वर्ष ८), लता कदम आणि रेणुका शेंडे आहे.

प्रेमसंबंधाच्या कारणावरून तरुणावर हल्ला; नग्न करून लोखंडी रॉडने मारहाण

रत्नागिरी जिल्ह्यातील खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवतांना आई, अत्यासह तिघांचा बुडून मृत्यू झाला. आठ वर्षीय लक्ष्मण कदम नदीच्या डोहात आंघोळ करत होता. त्यावेळी तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याची आई लता कदम आणि आत्या रेणुका शिंदे यांनी पाण्यात उडी घेतली. परंतु या घटनेत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

चिपळूण येथील खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीत लता कदम आणि रेणुका शिंदे कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत लता कदम यांचा आठ वर्षांचा मुलगाही होता. दोन्ही महिला कपडे धुत असताना लक्ष्मण आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला. त्यावेळी तो बुडू लागला. लता कदम यांचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्यावेळी त्यांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. परंतु हे दोघे बुडू लागले. हा प्रकार रेणुका शिंदे यांच्या लक्षात येताच त्यांनीही पाण्यात उडी घेतली. परंतु त्या डोहात तिघांचा बुडून मृत्यू झाला. नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेले तिघे घरी परत आले नाही. त्यामुळे त्यांचा शोध सुरु झाला. त्यावेळी नदीत दुर्घटना घडल्याचे कुटुंबीयांना लक्षात आले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्या तिघांच्या मृतदेहाचे शोधकार्य सुरु केले. नदीच्या डोहातून त्यांचे मृतदेह बाहेर काढले.

घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलीस घटनास्थळी पोहचले. मात्र, त्यापूर्वीच तिघांचे मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात यश आले होते. या प्रकरणाची नोंद शिरगाव पोलिसांत करण्यात आली आहे. पोलिसांनी तिन्ही मृतदेहांचा पंचनामा केला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यानंतर खडपोली रामवाडी गावात शोककळा पसरली. मृतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

भरधाव कारने एकाच कुटुंबातील सदस्यांना चिरडलं, दोघांचा मृत्यू तर पाच जण जखमी….

Web Title: Three people including mother and aunt died while saving a drowning child incident in ratnagiri district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 11:34 AM

Topics:  

  • crime
  • Ratnagiri
  • Ratnagiri District

संबंधित बातम्या

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड
1

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य
2

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य

शिंदेच्याचं शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गुंड म्हणाला मी इकडचा भाई ! माझी परवानगी घेतली का ?
3

शिंदेच्याचं शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गुंड म्हणाला मी इकडचा भाई ! माझी परवानगी घेतली का ?

Thane Crime: अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
4

Thane Crime: अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण, गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.