Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : चिपळूण बसस्थानकाचा तिढा सुटणार ! प्रताप सरनाईकांनी घेतली अधिकारी व संबंधित ठेकेदारांबरोबर बैठक

चिपळूण शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि एसटी प्रवाशांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या असलेल्या हायटेक मध्यवर्ती बस स्थानकाच्या सुरू असलेल्या कामाबाबत बैठक घेण्यात आली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 04, 2026 | 07:33 PM
ज्येष्ठांसाठी 'लालपरी' ठरतीये फायद्याची; तब्बल पावणेदोन लाख जणांनी केला मोफत प्रवास

ज्येष्ठांसाठी 'लालपरी' ठरतीये फायद्याची; तब्बल पावणेदोन लाख जणांनी केला मोफत प्रवास

Follow Us
Close
Follow Us:
  • चिपळूण बसस्थानकाचा तिढा सुटणार !
  • प्रताप सरनाईकांनी घेतली अधिकारी व संबंधित ठेकेदारांबरोबर बैठक
रत्नागिरी :  चिपळूण शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि एसटी प्रवाशांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या असलेल्या हायटेक मध्यवर्ती बस स्थानकाच्या सुरू असलेल्या कामाबाबत चिपळूणचे तरुण, तडफदार नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांनी पुढाकार घेतला आहे. शनिवारी त्यांनी ठाणे येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. परिवहन मंत्र्यांनी मंत्रालयात बैठक घेऊन त्यानंतर स्वतः प्रत्यक्ष पाहणी करण्याचे व लागेल तितका निधी बस स्थानकाच्या कामासाठी देण्याची ग्वाही या वेळी दिली. शुक्रवारी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शहरातील हायटेक मध्यवर्ती बस स्थानकाच्या सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांनी ठेकेदार तेजस शिंदे यांच्याकडून कामाची सविस्तर वस्तुस्थिती जाणून घेतली. यापूर्वीच १५ जानेवारीनंतर आपण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना चिपळूण येथे घेऊन येऊ, असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले होते. पाहणीनंतर तातडीने दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी नगराध्यक्ष उमेश सकपाळ ठाणे येथे पोहोचले.

Chiplun News : वाशिष्ठी कृषी महोत्सवात खवय्यांची पर्वणी ! 8 व 9 जानेवारीला पाककला स्पर्धेचे खास आकर्षण

प्रकल्पासाठी रु ५.८५ कोटींची दिली मंजुरी तेथे त्यांनी परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मध्यवर्ती बस स्थानकाच्या प्रकल्पासंदर्भातील सविस्तर माहिती त्यांच्यासमोर मांडली. यावेळी नगराध्यक्षांनी सांगितले की, या प्रकल्पाचे मूळ अंदाजपत्रक सन २०१६ मध्ये तयार करण्यात आले होते. कोरोना काळात निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे निधीत मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली. सुरुवातीला या प्रकल्पासाठी रु ५.८५ कोटींची मंजुरी देण्यात आली होती. मात्र निधी कपातीमुळे प्रकल्पाचा खर्च कमी करण्यात आला असून, सद्यस्थितीत हे काम रु २.८७कोटी रुपयांत पूर्ण केले जात आहे.

अधिकारी व संबंधित ठेकेदारांसोबत बैठक

Ratnagiri News: सरत्या वर्षाला पर्यटकांनी दिला निरोप; समुद्रकिनारी मोठा जल्लोष

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यानी प्रकल्पातील अडचणी, निधी कपातीमुळे आलेल्या मर्यादा तसेच उर्वरित कामासाठी आवश्यक निधीची बाब सविस्तरपणे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निदर्शनास आणून दिली. सर्व माहिती लक्षपूर्वक ऐकून घेतल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १५ जानेवारीनंतर मंत्रालयात परिवहन विभागातील अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्याचे जाहीर केले. तसेच या बैठकीनंतर स्वतः चिपळूण येथे येऊन हायटेक मध्यवर्ती बस स्थानकाच्या कामाची पाहणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना काळात निधीची कपात करण्यात आली होती, मात्र उर्वरित निधी व आवश्यक तेवढा अतिरिक्त निधी या कामासाठी उपलब्ध करून दिला जाईल, असे ठोस आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांना दिले. हा प्रश्न नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी गांभीर्याने हाती घेतल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

Web Title: Chiplun bus stand problem will be solved pratap sarnaik held a meeting with the officials and the concerned contractors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 07:33 PM

Topics:  

  • Chiplun
  • Pratap Saranaik
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Chiplun News: प्रवाशांसाठी ‘लालपरी’ सज्ज; 15 मार्चपर्यंत तब्बल ‘इतक्या’गाड्या सोडल्या जाणार
1

Chiplun News: प्रवाशांसाठी ‘लालपरी’ सज्ज; 15 मार्चपर्यंत तब्बल ‘इतक्या’गाड्या सोडल्या जाणार

लहान-थोरांसाठी ‘संकासुर’ अन् ‘गोमू’चा नाच ठरतोय चर्चेचा; संकासुराचा पाठलाग करणे…
2

लहान-थोरांसाठी ‘संकासुर’ अन् ‘गोमू’चा नाच ठरतोय चर्चेचा; संकासुराचा पाठलाग करणे…

Ratnagiri News: रत्नागिरीकरांवर करवाढीची टांगती तलवार? प्रशासनाची वाढली डोकेदुखी
3

Ratnagiri News: रत्नागिरीकरांवर करवाढीची टांगती तलवार? प्रशासनाची वाढली डोकेदुखी

Ratnagiri News: मांडवी समुद्रकिनारी बसणार आता सोलर लाईट
4

Ratnagiri News: मांडवी समुद्रकिनारी बसणार आता सोलर लाईट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.