
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
Tiger Shroff : मोठी बातमी समोर येत असून अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. जुहूमधील पुष्पा पार्क येथे अज्ञात हल्लेखोरांनी टायगर श्रॉफ याच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात टायगरच्या चालकालादेखील इजा झाल्याचे समोर येत आहे. तसेच एक रिक्षाचालकदेखील जखमी झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येऊन हा हल्ला केल्याचे समजत आहे. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली. टायगर श्रॉफ आणि इतर जखमींच्या प्रकृतीबाबत अद्याप अपडेट मिळालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला चढवला. बंदुकीने फायरींग केल्यावर गाडीच्या काचेवर गोळी लागली आणि काच फुटली. काच फुटल्यानंतर काचेचा तुकडे अंगात शिरल्याने टायगर श्रॅाफ जखमी झाल्याचे समजत आहे. तसेच चालकाच्या हाताला गोळी लागल्याने चालकदेखील जखमी झाल्याचे समजत आहे.
अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर…; पुण्यातील प्रकार
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी याबाबत ट्विट करत आपला रोष व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. मुंबईत नेमकं चाललंय तरी काय?”
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. मुंबईत नेमकं चाललंय तरी काय? बाबा सिद्दीकी यांची हत्या, सलमान खानच्या घरावर गोळीबार, अनेक अभिनेते आणि निर्मात्यांना धमक्या… मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कायदा-सुव्यवस्था नाही, तर जणू निर्व्यवस्थाच निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत! ‘महाराष्ट्राचा बिहार झाला’ असं म्हणण्याची वेळ आली होती; पण आता तर बिहार बरा, असं म्हणण्याची वेळ आली आहे. मुंबईला गुन्हेगारांच्या दहशतीत ढकलणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध! — Sachin M. Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 18, 2026
“बाबा सिद्दीकी यांची हत्या, सलमान खानच्या घरावर गोळीबार, अनेक अभिनेते आणि निर्मात्यांना धमक्या… मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कायदा-सुव्यवस्था नाही, तर जणू निर्व्यवस्थाच निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत!” असे ते म्हणाले.
पुढे राज्य सरकारवर निशाणा साधत “‘महाराष्ट्राचा बिहार झाला’ असं म्हणण्याची वेळ आली होती; पण आता तर बिहार बरा, असं म्हणण्याची वेळ आली आहे. मुंबईला गुन्हेगारांच्या दहशतीत ढकलणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध!” असे ते म्हणाले.