Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Crime: गोमांस विक्रीवरून दोन गट आमने-सामने, बजरंग दल कार्यकर्त्याला मारहाण; तणाव वाढला

अकोला शहरात दोन गट आमने-सामने आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी एका गोमास विक्री करणाऱ्या एका दुकानावर धाड टाकली. यानंतर मोठा गोंधळ उडाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 18, 2025 | 10:35 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

अकोला शहरात दोन गट आमने-सामने आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी एका गोमास विक्री करणाऱ्या एका दुकानावर धाड टाकली. यानंतर मोठा गोंधळ उडाला. दोन गट आमने- सामने आले आणि त्यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

छत्रपती संभाजीनगर हादरलं! वैयक्तिक वादातून एकाच कुटुंबाकडून तरुणावर चाकू-रॉडने जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास पोलिसांनी बैदपुरा येथील गोमास विक्रीच्या संशयित दुकानावर छापा टाकला. या कारवाईनंतर परिसरात दोन गट जमा झाले आणि त्यांच्यात तणाव वाढला. या गोंधळात बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच , दुसर्या गटाकडून दगडफेक करण्यात आल्याचेही वृत्त आहे.

बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलीस जेव्हा घटनास्थळी गेले, तेव्हा पोलिसांना मारहाण झाल्याचा दावा केला गेला होता. दरम्यान, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी हा दावा खोडून काढला असून, पोलिसांवर कोणताही हल्ला झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेत बजरंग दलाचा एक गोरक्षक किरकोळ जखमी झाला असून, त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलीस स्टेशनसमोर तणाव

घटनेनंतर, सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसमोर दोन्ही गटाचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे तब्बल 2 तास सिटी कोतवाली पोलीस ठाण्यासमोर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांचा मोठा बंदोबस्त तातडीने घटनास्थळी दाखल झाला आणि पुढील अनर्थ टळला.

खासदारांची मागणी काय?

या गोंधळ आणि हल्ल्याप्रकरणी अकोल्याचे आणि बजरंगदलाचे प्रांत संयोजक सुरज भगेवार यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दिली आहे. दरम्यान अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी शेतकऱ्यांच्या बैलजोडी व गोवंश चोरी आणि हत्येच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली असून, दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांकडून शांततेचे आवाहन

शहरात कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नयेत, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सध्या बैदपुरा परिसरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात ठेवली आहे.

PNB Scam Mehul Choksi: बेल्जियमच्या न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल! फरार मेहुल चोक्सीला भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

Web Title: Two groups clash over beef sale bajrang dal worker beaten up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 10:16 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

छत्रपती संभाजीनगर हादरलं! वैयक्तिक वादातून एकाच कुटुंबाकडून तरुणावर चाकू-रॉडने जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी
1

छत्रपती संभाजीनगर हादरलं! वैयक्तिक वादातून एकाच कुटुंबाकडून तरुणावर चाकू-रॉडने जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी

Mumbai Crime: मुंबईत अभिनेत्रीची ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली फसवणूक; सायबर भामट्यांनी 6.5 लाख रुपये उकळले
2

Mumbai Crime: मुंबईत अभिनेत्रीची ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली फसवणूक; सायबर भामट्यांनी 6.5 लाख रुपये उकळले

Mira Road : मिरा रोडमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली सदनिका लाटण्याचा धक्कादायक प्रकार
3

Mira Road : मिरा रोडमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली सदनिका लाटण्याचा धक्कादायक प्रकार

Rajasthan Crime: हृदयद्रावक! सुनेचा मृतदेह पाहताच सासूला बसला जबर धक्का; काही क्षणांत सासूने सोडले प्राण, गावात शोककळा
4

Rajasthan Crime: हृदयद्रावक! सुनेचा मृतदेह पाहताच सासूला बसला जबर धक्का; काही क्षणांत सासूने सोडले प्राण, गावात शोककळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.