crime (फोटो सौजन्य: social media)
नागपुरात अवघ्या काही तासात दोन ज्येष्ठ महिलांसोबत सोनसाखळी चोरल्याच्या घटना घडल्या आहेत आणि या चोरी एकाच टोळीने केल्याचं समोर आलं आहे.या चोरीचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. भर रस्त्यात ही घटना घडल्यामुळे नागपुरातील रस्त्यांवर चोर बिनधास्त फिरत आहेत कि काय? असा प्रश्न समोर आला आहे.
मोठी बातमी! पिंपरीत भरधाव वेगातील क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू, देहू-आळंदी रस्त्यावरील घटना
पहिली चोरी:
६० वर्षीय ज्येष्ठ महिला भाजी बाजारातून भाजी घेऊन पायी घराकडे जात असतांना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांची गळ्यातील १ तोळ्याची सोनसाखळी हिसकावून नेली. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. ही घटना सदर पोलीस स्टेशन अंतर्गत आझाद चौक येथे सकाळी नऊ वाजता घडली आहे.
दुसरी घटना :
६२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सव्वा टोळ्यांची सोन्याची चेन चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून नेली. ही घटना धंतोली पोलीस स्टेशन अंतर्गत समर्थ नगर भागात सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
या दोन घटनेने नागपुरात खळबळ उडाली आहे. आरोपींचा अद्याप कुठलाही सुगावा लागेलेला नाही आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीना शोधून काढणं हे आता पोलिसांपुढे आव्हान आहे.
लातूर हादरलं! ५० रुपयाची उधारी बेतली जीवावर; धारधार शस्त्राने वार….
राज्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. गुन्हेगारीचं सत्र सुरु आहे. आता लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. लातूरमध्ये केवळ ५० रुपयांच्या उधारीच्या मागणीवरून चक्क एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी, विवेकानंद चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लातूर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या किरकोळ उधारीमुळे घडलेल्या घटनेने लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.
काय घडलं नेमकं?
पानटपरीवरील 50 रुपयांची उधारी मागितल्याचा कारणावरून वाद होऊन या वादातूनच बाचाबाची झाली. आणि या बाचाबाचीचा रूपांतर मोठ्या वादात झाला. त्यानंतर आरोपींनी धारदार शास्त्र असलेल्या सुरा आणि कोयत्याने चौघांवर हल्ला केला. त्यातील गंभीर जखमी गणेश सूर्यवंशी याचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे जखमी असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक रणजीत सावंत यांनी दिली. ही घटना लातूरमधील बाभळगाव नाका परिसरातील म्हाडा कॉलनीत घडली. या घटनेची माहिती मिळताच लातूरच्या विवेकानंद चौक पोलिस ठाण्याचे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.किरकोळ उधारी मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातूनच ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
वैष्णवीनंतर मयुरीने संपवले जीवन: ६ वर्षांच्या चिमुकल्यासह… ; पुण्यातील घटनेने उडाली एकच खळबळ