Two sisters from Pune sexually assaulted Rajgurunagar Crime News
राजगुरूनगर : पुण्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मुलींच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राजगुरूनगर येथे वाडा रोडवर दोन लहान मुलींवर अत्याचार करुन त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या दोन्ही सख्या बहिणींवर अत्याचार करून त्यांना पाणी भरण्याच्या ड्रममध्ये भरून ठेवल्याचा भयानक आणि किळसवाणा प्रकार शहरातील वाडा रस्त्यावरील मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी गुरुवार (दि. २६) रोजी उघडकीस आला आहे.
नऊ आणि आठ वर्षांच्या या मुली ज्या ठिकाणी राहायला आहेत, तेथून जवळच असलेल्या एका बिअर बारमध्ये काम करीत असलेल्या परप्रांतीय मुलांच्या खोलीत मुलींचे मृतदेह पोलिसांना मिळुन आले असल्याचे समजते. या दोन्ही मुली बुधवारी दुपारी खेळताना गायब झाल्यावर शोध घेण्यात आला. मात्र त्या न भेटल्यामुळे पालकांनी संध्याकाळी खेड पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या दोघी सख्ख्या बहिणी असून बाहेरगावाहून मोलमजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील या मुली असल्याचे समजते. हरवलेल्या मुलींचा तपास करताना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार खेड पोलीसांनी मुलींच्या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या चाळीलगतच्या बिअर बारमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची झडती घेतली. त्यावेळी दीड ते दोन फुट पाणी असलेल्या एका ड्रममध्ये दोन्ही मुली मृत अवस्थेत आढळून आल्या असल्याचे सांगण्यात आले. दोघींचे मृतदेह चांडोली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून याबद्दल पोलिस निरिक्षक प्रभाकर मोरे यांनी माहिती दिली आहे.
बारच्या वेटरला अटक
राजगुरुनगर येथील धनराज बारमधील वेटरने हे खून केले असून पहाटे चारच्या सुमारास पुण्यातील एका लॉजवरून त्याला अटक करण्यात आले. संशयित आरोपी हा ५० ते ५५ वर्षाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर गुन्हा गंभीर असल्याने पोलिसांनी लगेच माहिती देण्यास नकार दिला. तपास सुरु असून खून का करण्यात आला? याची अजून कोणतीही माहिती पोलिसांकडून उपलब्ध झाली नाही.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुण्यात मुली नाही सुरक्षित
मावळ तालुक्यातील विसापूर किल्ला परिसरात आई- वडिलांसोबत फिरण्यासाठी आलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आडोशाला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संबंधित पोलिसाला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. 25) घडली. सचिन वसंत सस्ते असे अटक केलेल्या आरोपी पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाताळनिमित्त मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पर्यटन स्थळावर सुट्टीच्या अनुषंगाने लोक फिरण्यासाठी येतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या विसापूर किल्ल्यावर पुणे ग्रामीण मुख्यालय येथून अधिकचा बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्यामध्ये पोलीस सचिन सस्ते हा देखील विसापूर किल्ला परिसरात बंदोबस्तावर होता.