Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; कारण काय तर…

बुलेटचा कर्णकर्कश हॉर्न वाजविल्याबाबत विचारणा केल्याने ज्येष्ठ नागरिकाला बॅट तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 20, 2026 | 08:00 PM
पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; कारण काय तर...

पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; कारण काय तर...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वारगेट येथील महर्षीनगरमध्ये सोसायटीच्या अवारात बुलेटचा कर्णकर्कश हॉर्न वाजविल्याबाबत विचारणा केल्याने ज्येष्ठ नागरिकाला बॅट तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुलेट चालकासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनुसार, बुलेट चालकासह साथीदारांवर गु्न्हा दाखल करण्यात आला.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे महर्षीनगर भागातील सोसायटीत राहायला आहेत. आरोपी बुलेट चालक १७ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास सोसायटीच्या आवारात आला. त्याने जोरात बुलेटचा हॉर्न वाजविला. बुलेटचा कर्णकर्कश हॉर्नमुळे त्रासलेल्या ज्येष्ठाने विचारणा केल्यानंतर बुलेट चालकाने त्यांना शिवीगाळ केली. नंतर बुलेट चालक आणि साथीदार सोसायटीच्या आवारात आले. त्यांनी ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ केली. त्यांना लाथाबुक्क्या, तसेच बॅटने मारहाण केली. सहायक निरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.

बुलेटला बसविलेल्या सायलेन्सरमध्ये मॉडिफिकेशन करून फटाक्यासारखा कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्या तब्बल १५० बुलेट चालकांवर पोलिसंनी नुकतीच कारवाई केली आहे. बेशिस्त दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई करण्यास विशेष मोहिम राबविली आहे. या मोहिमेत विरूद्ध दिशेने जाणरे दुचाकीस्वार, ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई करुन दुचाकी जप्त केल्या होत्या.

हे सुद्धा वाचा : बनावट कागदपत्रांद्वारे खरेदीखत नोंदणीचा प्रयत्न; लोणावळा शहर पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या

विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून

लातूर शहरात एक खळबळजनक घटना घडली असून, एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. ही घटना लातूर शहरातील औसा रोडवरील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विक्रम पांचाळ (वय 21) असे चाकूने भोसकून खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या समोर एका तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. किरकोळ कारणावरुन काही दिवसांपूर्वी वाद झाला होता, या किरकोळ वादाचे रूपांतर खुनामध्ये झालं. पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. या हाणामारी दरम्यान विक्रम पांचाळ याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत विक्रमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं; मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

Web Title: A shocking incident has taken place in pune where a bullet driver beat up a senior citizen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

महिलेचा छळ करण्यासाठी तिचा ई-मेल आयडी टाकला पॉर्न साईटवर! मग अटक झाल्यावर जामीन मागण्यासाठी गेला अन्‌ न्यायाधीशांनी थेट…
1

महिलेचा छळ करण्यासाठी तिचा ई-मेल आयडी टाकला पॉर्न साईटवर! मग अटक झाल्यावर जामीन मागण्यासाठी गेला अन्‌ न्यायाधीशांनी थेट…

वारी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ, कडेकोट बंदोबस्तातही 11 साखळी चोरी; हडपसरमध्येच 9 घटना
2

वारी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ, कडेकोट बंदोबस्तातही 11 साखळी चोरी; हडपसरमध्येच 9 घटना

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर; सिया आणि चेतन निर्दोष सुटणार?
3

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर; सिया आणि चेतन निर्दोष सुटणार?

धनकवडीतील उड्डाणपुलाजवळ डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून एकाचा खून; आरोपींचा शोध सुरु
4

धनकवडीतील उड्डाणपुलाजवळ डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून एकाचा खून; आरोपींचा शोध सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.