Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुधवार पेठेतील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेशी महिलांना पुण्यात आणणारा सूत्रधार उघड

बांगलादेशी महिलांना पुण्यात आणणारा सूत्रधार ‘बाबू भैया’ उर्फ पापा शेख असल्याचे तपासात समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 21, 2026 | 11:26 AM
बुधवार पेठेतील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेशी महिलांना पुण्यात आणणारा सूत्रधार उघड

बुधवार पेठेतील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेशी महिलांना पुण्यात आणणारा सूत्रधार उघड

Follow Us
Close
Follow Us:
  • बुधवार पेठेतील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
  • बांगलादेशी महिलांना पुण्यात आणणारा सूत्रधार उघड
  • पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु
पुणे : पुण्यातील बुधवार पेठेतील मानवी तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर आता या बांगलादेशी महिलांना पुण्यात आणले कसे जाते आणि कोण आणते असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात पोलिसांनी तपास करत याचा सूत्रधार ‘बाबू भैया’ उर्फ पापा शेख असल्याचे तपासात समोर आले आहे.

 

गेल्या आठवड्यात बुधवार पेठेत पुणे पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत झाडाझडती घेतली होती. त्यानंतर तीन दिवसांतच पुन्हा गुप्त माहीतीवरून बुधवार पेठेत कारवाई छापा मारत ११ बांगलादेशी महिलांना पकडले. या महिला काहीच महिन्यांपूर्वी बुधवार पेठ येथे आल्याचे समोर आले. त्यांच्याजवळ बनावट आधार कार्डांसह इतर खोटे कागदपत्रे आढळून आली. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आता पोलिसांनी या महिलांना पुण्यात आणणारे आणि त्यांना कागदपत्रे तयार करून देणारे अश्यांची साखळी उघड केली आहे. तेव्हा पापा शेख याचा सूत्रधार असल्याचे तसेच बांगलादेश सीमेवरील दलालांशी थेट संबंध असल्याचे उघड झाले आहे. तो दलालांच्या माध्यमातून महिलांना आधी कोलकता येथे आणत होता. तेथून बोगस कागदपत्रांच्या आधारे त्यांना पुण्यात पाठवले जात होते. ब्युटी पार्लर तसेच शिलाई या कामाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलांना फसवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. पण पुण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून जबरदस्तीने देह व्यवसाय करून घेतला जात असल्याचे सांगितले जाते.

या प्रकरणातील आरोपी पापा शेखसह सुमित्रा कांबळे, राजेश कलीमनी, रणजीत पात्रा, रूपा शेख हे प्राथमिक तपासानुसार संघटित पद्धतीने मानवी तस्करीचे रॅकेट चालवत होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पापा शेख फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पापा शेख सुमारे २० वर्षांपूर्वी बुधवार पेठेतील एका हॉटेलमध्ये काम करत होता. कालांतराने त्याने आपले जाळे निर्माण केले. अवैध धंद्यांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मागील काही वर्षांत त्याने मोठी आर्थिक उलाढाल केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपासात पापा शेखच्या तीन पत्नी असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी एक महिला बांगलादेशी असल्याची माहिती आहे. बुधवार पेठ परिसरात त्यांचे प्रस्थ असून, महिलांवर दबाव टाकणे व बाहेर पडू न देणे यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे.

हे सुद्धा वाचा : माझा भाऊ नाही याचं दुःख, पण आता…; विलिनिकरणाबाबत सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं

Web Title: Police have received information about the accused who brought bangladeshi women to pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune Crime: फेसबुकवरून ओळख, लग्न आणि संशय; आळंदीत चिमुकलीसह वृद्धेची निर्घृण हत्या
1

Pune Crime: फेसबुकवरून ओळख, लग्न आणि संशय; आळंदीत चिमुकलीसह वृद्धेची निर्घृण हत्या

पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
2

पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

महाळुंगेमध्ये मध्यरात्री एटीएम फोडले, लाखोंची रोकड लंपास; औद्योगिक पट्ट्यात खळबळ
3

महाळुंगेमध्ये मध्यरात्री एटीएम फोडले, लाखोंची रोकड लंपास; औद्योगिक पट्ट्यात खळबळ

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची ऑनलाईन फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
4

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची ऑनलाईन फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.